Tue, Jun 15, 2021 12:35
नुसरत जहाँने मला फसवून धोका दिला; निखील जैनचा गंभीर आरोप

Last Updated: Jun 11 2021 1:07PM

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्यातील वादामुळे दोघेही सध्या चर्चेत आले आहेत. निखिल आणि नुसरत दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. नुसरत जहाँ यांनी  केलेल्या धक्कादायक वक्त्याव्यानंतर निखिलने मोठा खुलासा केला आहे. 

नुसरत यांनी लग्नच वैध नाही, मग घटस्फोट कसला? असा सवाल करत निखिल जैनसोबत केलेल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले होते. या कारणावरून सध्या निखिल खूपच भडकला आहे, यात त्याने नुसरत आणि यश दासगुप्ता यांच्यात अफेअर असल्याचा इशारा दिला आहे. मात्र त्याने स्पष्टपणे यशचं नाव घेतलं नाही. मात्र काहीही न बोलता निखिलने याच कारणामुळे आपल्या विवाहित जीवनात वाद निर्माण झाल्याचे सांगितले आहे. तसेच निखीलने आपण लग्न रजिस्टर करण्यास अनेकदा तगादा लावला होता, मात्र नुसरत कायमच ही गोष्ट नाकारत असल्याचे म्हटले आहे.  

वाचा : 'ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है!' श्रुती मराठेचा पावसात कातिलाना अंदाज (Photos)

याशिवाय निखीलने २०२० च्या ऑगस्ट महिन्यात एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान नुसरतच्या स्वभावात बदल झाला. याचं कारण मात्र फक्त नुसरतला माहित आहे. माझ्या पत्नीच्या स्वभावात एवढा बदल झाला की, मला विश्वासच बसला नाही. हा चित्रपट यश दासगुप्तासोबत रिलिज होणार होता. दोघे मिमी चक्रवर्तीसोबत लीड रोलमध्ये दिसले. 'एसओएस कोलकाता' असे या चित्रपटाचे नाव होते. नुसरत आणि यश दोघंही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होते. दोघांचे एकत्रित अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. यामुळे दोघांच्यात जवळीकता वाढली होती. तसेच ५ नोव्हेंबर २०२० रोजी नुसरत आपली बॅग आणि काही सामान (सर्व खासगी गोष्टी, महत्वाचे कागदपत्रे) घेऊन आपल्या फ्लॅटवर शिफ्ट झाली. यानंतर आम्ही वेगळे झालो असल्याचे त्याने सांगितले आहे. 

वाचा :उर्वशी रौतेलाला 'त्याने' पोटावर मारले दे दणादण पंच! (Video)

नुसरत जहाँ आणि निखिलने २०१९ मध्ये दोघांनी तुर्कीमध्ये लग्न केले होते. यावेळी या लग्नाची खूपच चर्चा झाली होती. तर नुसरतच्या प्रेग्नेंसीबाबत मला काहीच माहिती नसल्याचे देखील निखिलने म्हटले आहे.