Tue, Jun 15, 2021 12:20
लग्नाला इतकी वर्षे झाली, फॅमिली प्लॅनिंग काय केलंय? नेटकऱ्यांच्या प्रश्नांवर अंकिता कोंवरचे अफलातून उत्तर 

Last Updated: Jun 10 2021 2:01PM

पुढारी ऑनलाईन डेस्क; अभिनेता मिलिंद सोमनने आपल्या वयापेक्षा कितीतरी लहान असणाऱ्या अंकिता कोंवरशी लग्न केलं आणि सगळीकडे चर्चेला एकच उधाण आले. सुपर मॉडेल मिलिंद आणि अंकिता कपल गोल्ससोबत फिटनेस गोल्सदेखील देतात. अंकिता हिने नुकताचं आपल्या फॅन्ससोबत बातचीत केली. Ask Me Anything सेशनदरम्यान एका फॅन्सने अंकिताला तिच्या फॅमिली प्लॅनिंगविषयी प्रश्न उपस्थित केला. पण, अंकिताने कुठलीही तमा न बाळगता काय उत्तर दिलं पाहा. 

अधिक वाचा- रात्रीस खेळ चाले : सावंतवाडीकर शेवंता आपल्याविषयी काय सांगते?

कधी आई-वाबा होणार अंकिता- मिलिंद?

एका युजरने लिहिले- तुमच्या लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत. तुम्ही फॅमिली प्लॅनिंगविषयी काय विचार केला आहे? अंकिताने उत्तरात लिहिलं की- आम्ही प्लॅन्ड फॅमिली आहे.  

दुसऱ्या युजरने अंकिताला विचारलं की, भारतात आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न न करण्याची पध्दत आहे. तू ही गोष्ट कशी मॅनेज केली?

अंकिता म्हणाली- जोदेखील सोसायटीमध्ये कॉमन असत नाही. लोक नेहमी त्याच्याविषयी बोलतात. हे केवळ भारतापर्यंत मर्यादित नाही. माहित नसलेल्या गोष्टींवरून लगेच विचित्र पध्दतीने प्रतिक्रिया देण्याची आपली सवय असते. मी नेहमी तेचं केलं ज्यामुळे मला आनंद होतो. 

अंकिता आणि मिलिंद यांनी २२ एप्रिल, २०१८ रोजी अलीबागमध्ये लग्न केले होते. या खासगी सोहळ्यात केवळ जवळच्या लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. अंकिता - मिलिंद दोघेही फिटनेस फ्रिक आहेत. दोघेही एकत्र वर्कआउट आणि रनिंग करताना दिसतात. त्याचे खूप सारे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.