Thu, Jan 21, 2021 01:27होमपेज › Soneri › नीना गुप्ताने शेअर केली 'खास' आठवण!

नीना गुप्ताने शेअर केली 'खास' आठवण!

Last Updated: Oct 16 2019 7:12PM

नीना गुप्ता आणि निखिल भगत    मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडमध्ये रातोरात स्टार्स होण्याचे सध्या वारे वाहू लागले आहे. काही सेलिब्रिटींना अचानक मिळणारी प्रसिद्धी कायम टिकवून ठेवली तर काही ती गमवावी लागली. नीना गुप्ताने आपल्यासोबत एका अभिनेत्याचा फोटो शेअर केला आहे जो रातोरात स्टार बनला होता. परंतु, हा कलाकार अगदी नगन्य चित्रपटात झळकला आहे. 

नीना गुप्ताने आपल्या इन्स्टाग्रामवरून १९८५ च्या 'त्रिकाल' या चित्रपटातील अभिनेत्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत निखिल भगत दिसत आहेत. या फोटोसोबत नीनाने एक कॅप्शन ही लिहिली आहे की, 'थ्रोबॅक... 'त्रिकाल' या चित्रपटात मी आणि निखिल. निखिल आता सध्या तू कोठे आहेस, तर तू कसा दिसतोस?'   

याआधी निखिल भगतने २०१५ मध्ये इम्तियाज अलीच्या 'तमाशा' या चित्रपटात दीपिका पादुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली होती. याशिवाय निखिलने १९८४च्या 'हिप हिप हुर्रे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. श्याम बंगाल यांच्या 'त्रिकाल' या चित्रपटात निखिलने रुइज परीराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात निखिल भगत आणि नीना गुप्ताशिवाय लीला नायडू, नसीरुद्दीन शाह, सोनी राजदान, दलीप ताहिल, अनीता कंवर, के. के. रैना आणि इला अरुण यासारख्या गाजलेल्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात नीनाने मुख्य भूमिका साकरली आहे. याशिवाय या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित केले होते.

याआधी नीना गुप्ता राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेता 'बधाई हो' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्रा ही झळकली आहे. याशिवाय नीना अश्विनी अय्यर तिवारी यांच्या 'पंगा' आणि रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटात ही काम करत आहे.

(photo : neena_gupta instagram वरून साभार)