Fri, Nov 27, 2020 11:27होमपेज › Soneri › मलायकाचा 'हुआ छोकरा जवान'वर भन्नाट डान्स (video)

मलायकाचा 'हुआ छोकरा जवान'वर भन्नाट डान्स (video)

Last Updated: Nov 21 2020 4:30PM

मलायका अरोरानवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडची 'फिटनेस क्वीन' मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती आपले क्यूट फोटो आणि व्डिडिओज शेअर करत असते. दरम्यान मलायकाचा स्टेजवर डान्स करतानाचा आणखी एक व्डिडिओ व्हायरल झाला आहे.   

अधिक वाचा : अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरून महेश टिळेकर-आरोह वेलणकर यांच्यात जुंपलं

मलायका अरोरा सध्या सुट्यांचा आनंद घेत आहे. याच दरम्यान तिचा जुना एका व्डिडिओ व्हायरल झाला आहे. यात मलायका अरोरासोबत पुनीत पाठक आणि इतर काही कलाकार स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांच्या 'हुआ छोकरा जवान' या धमाकेदार गाण्यावर हा डान्स केला आहे. मलायकाच्या या व्डिडिओनं काही मिनिटांतच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या व्हिडिओत मलायकाने राखाडी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तो मलायकावर खूपच सुंदर दिसत आहे. या व्डिडिओवर चाहत्यांनी अनेक कॉमेंटस् केल्या आहेत.  

अधिक वाचा :'फँड्री'मधील जब्याची शालू आता दिसते इतकी सुंदर 

मलायका अरोरा 'इंडियाज बेस्ट डान्सर शो' मध्ये जज म्हणून काम करत आहे. मलायका जजसोबत या शोमध्ये गाण्यावर डान्स देखील करत आहे. मलायका अरोरा नेहमीच तिच्या स्टाईल आणि वेगवेगळ्या लुकसाठी चर्चेत असते. 

(video : dancenjoy_ instagram वरून साभार)