नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपले 'कॅन्डल' हे गाणे रिलीज केले आहे. सोशल मीडियावर हे गाणे तिने आपल्या अकाऊंटवरून पोस्ट केले आहे. फेसबूक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर तिच्या आवाजातील हे गाणे पाहायला मिळेल.
माधुरीने बुधवारी घोषणा केली होती की, शनिवार दि. २३ रोजी तिचे कॅम्डल हे गाणे रिलीज होईल. तिने आपल्या ट्विटरवर याबद्दलची माहिती घेतली होती. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं-आपण सगळे स्ट्रॉन्ग राहुयात, एकत्र येऊया. आपल्याला आशावादी आणि सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. #Candle ३ दिवसांत रिलीज होत आहे.
आपल्या गायन क्षेत्रातील पदार्पणाबद्दल बोलताना माधुरी म्हणाली होती की, जेव्हा मी मोठी होत होते, तेव्हा संगीतान आमच्या घरातील एक महत्त्वाची भूमिका साकारली होती...त्यामुळे मी माझ्या वाढदिवसाला टीझर रिलीज करण्याचा आणि आपलं गाणं शेअर करण्याचा निर्णय घेतला.”
‘कॅन्डल’चा अर्थ आहे आशेचा किरण. कोरोनामुले हजारो लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, माधुरी तिचे हे गाणे घेऊन आली आहे. तिने कोरोना वॉरियर्सचा सन्मान करत हे गाणे गायले आहे.