Fri, Sep 25, 2020 16:06होमपेज › Soneri › कपिल शर्माच्या घरी 'नन्ही परी'चे आगमन  

कपिल शर्माच्या घरी 'नन्ही परी'चे आगमन  

Last Updated: Dec 10 2019 1:26PM

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथमुंबई : पुढारी ऑनलाईन

कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्यांची पत्नी गिन्नी चतरथ आई-बाबा झाले आहेत. गिन्नी चतरथने एका लहान परीला जन्म दिला आहे. यांची माहिती स्वत: कपिल शर्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. यानंतर मात्र सर्वसामान्यांसह बॉलिवूड कलाकारांनीही कपिल शर्मा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.  

कपिलने ट्विट करत लिहिले आहे की, 'मला मुलगी झाल्याचा आनंद झाला आहे. आम्हाला तुम्हा सर्वाचे आशीर्वाद हवे आहेत. आपणा सर्वांना प्रेम. जय माता दी.'

कपिलने हे ट्विट सकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास केले आहे. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. त्यामध्ये सर्वसामान्यांसह बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनीही कपिल शर्माचे अभिनंदन केले आहे.

रॅपर गुरु रंधावा यांनी कपिल शर्माचे अभिनंदन करत लिहिले आहे की, 'अभिनंदन मेरे पाजी, मी काका झालो.'

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही कपिलचे अभिनंदन केले. तर त्यांनी लिहिले आहे की, 'मुलगी झाल्याने तुम्हाला खूप- खूप अभिनंदन.'

कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बाम यांनी ही कपिल शर्माचे अभिनंदन केले. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'भाऊ तुम्हाला अभिनंदन.'

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी ट्विट करुन कपिल शर्माचे अभिनंदन केले. यामध्ये तिने लिहिले की, 'अभिनंदन'.

कपिल शर्मा आणि गिन्नीचे गेल्या वर्षी  १२ डिसेंबरला जालंधरमध्ये लग्न झाले होते. यानंतर कपिल आणि गिन्नी दोघांनी दिल्ली आणि मुंबई येथे रिसेप्शन पार्टी दिली होती. या पार्टीत 'द कपिल शर्मा शो'मधील सर्व कलाकार तसेच टीव्ही आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी गिन्नी चतरथने बेबी शॉवर फंक्शन केले होते.
 

 "