Thu, Aug 06, 2020 04:32होमपेज › Soneri › कार्तिकीचा 'तो' सैराट व्हिडिओ पाहिलात का?

कार्तिकीचा 'तो' सैराट व्हिडिओ पाहिलात का?

Last Updated: Aug 01 2020 3:12PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

सा रे ग म प- लिटील चॅम्प्स’ या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी कार्तिकी गायकवाड सध्या चर्चेत आहे. आपल्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी कार्तिकीचे आयुष्य आता एका नव्या वळणावर आहे. २६ जुलै रोजी कार्तिकीचा साखरपुडा झाला आहे. आता तिच्या साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

कार्तिकीने २६ जुलैला रोनित पिसेसोबत साखरपुडा केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. आता कार्तिकीच्या आयुष्यातील खास क्षणांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिकी आणि रोनित अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत. कार्तिकीने हा व्हिडिओ तिच्या ऑफिशियल यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. 

कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांनी मित्रपरिवारात हे लग्न ठरवले आहे. रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून तो इंजिनिअर आहे. लग्नाची तारीख अद्याप काढण्यात आलेली नाही, अशी माहिती कार्तिकीने दिली होती.