मुंबई : पुढारी ऑनलाईन
सुपरडूपर हिट ठरलेला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट आठवतो का? कॉलेज तरूणांचे विश्व, प्रेम मांडणारा करण जोहर दिग्दर्शित तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता पुन्हा एकदा ‘कुछ कुछ होता है’ची चर्चा होत आहे. या चित्रपटात मोठी चूक केल्याची कबुली खुद्द करण जोहरने एका मुलाखतीत दिली.
‘मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव’मध्ये करण जोहरने या चित्रपटाविषयीचा एक किस्सा सांगितला. आणि आपण केलेली चूक मान्य केली.
... आणि शबाना आझमी यांनी फटकारले
करण म्हणाला, 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट शबाना आझमी यांनी यूकेमध्ये कुठेतरी हा चित्रपट पाहिला होता. त्यांनी मला फोन केला. त्या खूप चिडलेल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘तू हे काय दाखवले आहेस? त्या मुलीचे केस लहान आहेत, त्यामुळे ती आकर्षक दिसत नाही आणि जेव्हा तिचे केस मोठे होतात तेव्हा ती सुंदर दिसते?’ अर्थातच त्या काजोलच्या भूमिकेविषयी बोलत होत्या. मग, मी त्यांची माफी मागितली. यावर त्या म्हणाल्या, तुला फक्त एवढेच बोलायचे आहे का? मी म्हणालो होय. कारण मला माहित आहे की, तुम्ही जे म्हणत आहात, ते अगदी योग्य आहे.”
चित्रपटातील पहिल्या भागात काजोलचा लुक लहान केस, जीन्स, टी-शर्ट घालणारी दाखवण्यात आले आहे. दुसऱ्या भागात अचानक तिचा मेकओव्हर झाल्याचे दाखवण्यात आले आहे. या लुकमध्ये पाहून तेव्हा शाहरुख खान तिच्या (काजोल) प्रेमात पडतो.
'कुछ कुछ होता है' या चित्रपटामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका होत्या. विशेष म्हणजे, या चित्रपटात झळकण्यास बॉलिवूडमधील रविना टंडन, ऐश्वर्या राय बच्चन, ट्विंकल खन्ना, तब्बू, उर्मिला मातोंडकर, शिल्पा शेट्टी या अभिनेत्रींनी नकार दिला होता.