Sat, Apr 10, 2021 19:57होमपेज › Soneri › कनिका कपूरचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

कनिका कपूरचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

Last Updated: Mar 24 2020 3:59PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

गायिका कनिका कपूरची दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट करण्यात आली. दुसऱ्यांदा हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. कनिकाची कोरोनाची पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु, पुन्हा दुसऱ्यांदा तिची टेस्ट करण्यात आली. तिचा दुसराही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

सध्या कनिकाची तब्येत स्थिर आहे. रविवारी कनिकाची दुसऱ्यांदा टेस्ट करण्यात आली. यावेळी कनिकाच्या पहिल्यांदा झालेल्या टेस्टच्या रिपोर्टवर तिचे वय आणि लिंग याबद्दल चुकीची माहिती देण्यात आली होती. त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय २८ वर्षे आणि लिंग पुरुष असे लिहिण्यात आले होते. त्यामुळे या रिपोर्टवर कनिकाच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली होती. 

आणखी ३५ लोकांनी केली टेस्ट 

दुसरीकडे, कनिका लखनौत आल्यानंतर पार्टीमध्ये सहभागी झाली होती. कनिका कपूरसोबत जे ३५ लोक अपार्टमेंटमध्ये उपस्थित होते, त्या लोकांनीही टेस्ट करून घेतली आहे. यापैकी, ११ लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. अन्य २४ लोकांच्या टेस्टचा रिपोर्ट यायचा आहे.