Sun, Feb 28, 2021 06:37
कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर निर्बंध, ‘धाकड गर्ल’ पुन्हा संतप्त

Last Updated: Jan 20 2021 4:14PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सतत सोशल मीडियाद्वारे तिचे मत मांडताना दिसते. नुकतेच तिने ‘तांडव’ (Tandav) वेब सीरिजवरुन सुरु असलेल्या वादावर ट्विटवरून (Kangana Ranaut Twitter) आपले मत व्यक्त केले होते. कंगनाने ट्वीटमध्ये थेट सीरिजचे निर्माते अली अब्बास जफर यांच्यावर निशाणा साधला होता. तिच्या या ट्विटमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून ट्विटरने कारवाई करत कंगनाचे अकाउंटवर काही काळासाठी निर्बंध लादले. याबाबतची माहिती खुद्द कंगनानेच दिली. 

अभिनेत्री कंगना राणावतने दावा केलाय की, 'तांडव' (Tandav) वेब सीरिजच्या निर्मात्यांविषयी मी केलेल्या टिप्पणी नंतर ट्विटर(Twitter)ने माझे अकाउंट काही काळासाठी प्रतिबंधित केले. तिने ही माहिती ट्विट करून दिली आहे. तसेच हे कंगनाने हे ट्विट ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांना टॅग केले आहे. तसेच चिडलेल्या कंगनाने थेट धमकीच दिली असून तिच्याविरोधात भूमिका घेणाऱ्यांना तुमचं जगणं अवघड करणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. 

कंगनानं आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, लिबरल लोक आपले काका जॅक यांच्याकडे जाऊन रडत आहेत आणि माझ्या अकाउंटवर काही काळासाठी निर्बंध आणले आहेत. ते मला धमक्याही देत आहेत. ट्विटरवरच अकाउंट म्हणजेच माझी व्हर्चुअल ओळख देशासाठी शहीद होऊ शकते. मात्र, माझं रिलोडेड देशभक्तीचं व्हर्जन सिनेमांद्वारे पुन्हा पुन्हा परत येईल. याद्वारे तुमचं जगणंच मी अवघड बनवून ठेवेने.

दरम्यान, कंगनाने सोमवारी ट्विटरवरून 'तांडव' वेब सीरिजचा दिग्दर्शक अली अब्बास जफरवर निशाणा शाधला. कंगनाने या पोस्टमध्ये एक वादग्रस्त विधान केले. तिच्या या विधानावरून वाद सुरू झाला. त्यानंतर काही वेळाने कंगने हे ट्विट डिलीट केले. आता ट्विट का हटविले याबाबत तिने स्पष्टीकरण देण्यासाठी आणखी एक ट्विट केले.

ट्विटरने आपल्या धोरणांमध्ये बदल केले आहेत. तसेच वादग्रस्त ट्विट करणा-याविरुद्ध कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. याचाच फटका कंगना राणावाला बसल्याची शक्यता आहे.