Thu, Aug 13, 2020 16:58होमपेज › Soneri › करण जोहर इम्रान हाश्मीला सुशांत सिंह राजपूतबद्दल 'तो' प्रश्न विचारतो आणि...

करण जोहर इम्रान हाश्मीला सुशांत सिंह राजपूतबद्दल 'तो' प्रश्न विचारतो आणि...

Last Updated: Jun 27 2020 5:56PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या हृदयात चांगलीच जागा निर्माण केली होती. वयाच्या ३४ व्या वर्षी तो जग सोडून गेला. त्याच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनाही धक्का बसला आहे. 

सुशांत सिंह राजपूतला चाहत्यांसह बॉलिवूड कलाकार सतत त्याच्या आठवणी ताज्या करत आहेत. नुकताच अभिनेता इमरान हाश्मीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेव्हा करण जोहरने करण (कॉफी विथ करण) कॉफी शो दरम्यान इमरान हाश्मीला विचारले की भविष्यकाळ सर्वांधिक कोणाचा उज्ज्वल आहे? यावर इम्रान हाश्मीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे नाव घेतले होते. 

व्हिडिओमध्ये महेश भट्ट आणि इमरान हाश्मी कॉफी विथ करण दरम्यान करण जोहरच्या प्रश्नांचा सामना करताना दिसत आहेत. तथापि, जेव्हा बॉलिवूडमध्ये भविष्यकाळ कोणाचा उज्ज्वल आहे याबद्दल अभिनेत्याला विचारले जाते, तेव्हा इम्रान सुशांतसिंह राजपूतचे नाव घेतो. त्यानंतर वरुण धवन आणि सिद्धार्थ यांचा उल्लेख करतो. इम्रान हाश्मीचा सुशांत सिंह राजपूतवरून बोललेला तो व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

सुशांत सिंह राजपूतविषयी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 'किस देश में है मेरा दिल' पासून केली. यानंतर सुशांत सिंह राजपूतने 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली, यासाठी त्याला खूप पसंती मिळाली. यानंतर नचके दिखा आणि झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्येही त्याची चर्चा झाली. 'काय पो चे' या चित्रपटाद्वारे अभिनेत्याने चित्रपट जगतात प्रवेश केला.