Thu, May 28, 2020 17:04होमपेज › Soneri › हैदराबाद प्रकरण : दोषींना कठोर शिक्षा द्या, सेलेब्सची मागणी  

हैदराबाद प्रकरण : दोषींना कठोर शिक्षा द्या, सेलेब्सची मागणी  

Last Updated: Dec 02 2019 7:05PM
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन 

हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण देशात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आंदोलने होत आहेत. बॉलिवूड सेलेब्रिटींनीही आपला संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

राखी सावंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंत दु:खी झालेली दिसते. हैद्राबादमध्ये झालेल्या दुर्घटनेविरोधात ती संताप व्यक्त करताना दिसते. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी ती व्हिडिओमध्ये करताना दिसत आहे. 

कबीर सिंहचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनीही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी ट्विटरवर लिहिले आहे-

Image may contain: 1 person, text

आरोपींना मृत्युदंडाची मागणी करत ऋषी कपूर यांनी ट्विट केलं-“मी दुष्कृत्य करणाऱ्यांसाठी मृत्यूदंडाचे समर्थन करतो. हे थांबायला हवं.” अभिनेता फरहान अख्तरनेही ट्विट केलं आहे.

Image may contain: text

Image may contain: text

अभिनेता महेश बाबूने म्हटले आहे-

Image may contain: text