Tue, Jun 15, 2021 11:36
लक्षद्वीप प्रशासकांना जैविक शस्त्र म्हणणाऱ्या दिग्दर्शिका आयशा सुल्तानाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा!

Last Updated: Jun 11 2021 2:08PM

पुढारी ऑनलाईन; लक्षद्वीपच्या प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शिका आणि अभिनेत्री आयशा सुल्ताना यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयशा यांनी काही दिवसांपूर्वी एका मल्याळम टीव्ही डिबेट दरम्यान कोविड-१९ वरून केंद्र सरकारवर आरोप केले होते. यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

आयशा यांच्या विधानानंतर त्यांच्याविरोधात लक्षद्वीप युनिटचे भाजप अध्यक्ष अब्दुल खादर यांनी तक्रार दाखल केली होती. लक्षदीपच्या कवरत्ती पोलिसांनी त्यांच्याविरोधात भादंसं कलम १२४ ए (देशद्रोह) आणि १५३ बी अंतर्गत केस दाखल करण्यात आली. 

वाचा -श्रुती मराठेचा कातिलाना अंदाज (Photos)

लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत खादर यांनी म्हटले आहे की, सुल्ताना यांनी एका मल्याळम टीव्ही चॅनेलच्या डिबेटवेळी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आयशा यांनी केंद्र सरकारविरोधात खोटे आरोप केले आहेत. लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारद्वारा कोविड -१९ हे जैविक शस्त्र म्हणून वापरले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.'

त्यांनी पुढे म्हटलं आहे की, आयशा यांचे विधान पूर्णपणे देशविरोधी आहे. यामुळे केंद्र सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. असं पुन्हा होऊ नये म्हणून आयशा यांच्याविरोधात कडक कारवाई केली जावी. त्यांनी आयशा यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत आंदोलन केले. आयशा यांनी अनेक मल्याळम चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले आहे. सुल्ताना लक्षद्वीप येथील चेटियाथ बेटावर राहणाऱ्या आहेत.