Wed, May 12, 2021 01:47होमपेज › Soneri › 'फँड्री'ची शालू आता दिसते इतकी सुंदर, पाहा फोटो  

'फँड्री'मधील जब्याची शालू आता दिसते इतकी सुंदर

Last Updated: Nov 21 2020 3:32PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

नागराज मंजुळेचा फँड्री हा चित्रपट चांगला गाजला. या चित्रपटातील शालू तुम्हाला आठवते का? जब्या अर्थातच सोमनाथ अवघडेला शालूशी म्हणजेच राजेश्वरी खरातशी प्रेम होतं. असं फँड्रीमध्ये दाखवण्यात आलं आहे. 

राजेश्वरी खरात आता मोठी झाली आहे. तिला फोटोशूट करायला आवडतं. 

राजेश्वरी पुण्याची राहणारी आहे. राजेश्वरीने फँड्रीतून मराठी चित्रपटातून डेब्यू केलं होते. 

विशेष म्हणजे या चित्रपटात राजेश्वरीचा एकही डायलॉग नव्हता. तरीही प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाला दाद दिली आणि चित्रपट हिट ठरला. 

राजेश्वरीच्या कुटुंबीयातील कोणीही चित्रपट इंडस्ट्रीत नाही. तिचे वडील बँकेत नोकरी करतात.

फँड्रीमध्ये राजेश्वरीला शालूची भूमिका मिळण्यामागे इंटरेस्टिंग कहाणी होती. 

मनमोहक राजेश्वरी खरात | Beautiful Rajeshwari Kharat #rajeshwarikharat  #marathiactress | Tie dye top, Dyed tops, Striped top

चित्रपटाच्या कास्टिंग टीमला पुण्यातील रस्त्यावर राजेश्वरी दिसली होती. 

चित्रपटाच्या कास्टिंग टीमने राजेश्वरीला फँड्री चित्रपट ऑफर केला. परंतु, राजेश्वरीने चित्रपट करण्यास नकार दिला. 

त्यानंतर फँड्रीच्या कास्टिंग टीमने राजेश्वरीच्या घराचा पत्ता शोधून काढला आणि तिच्या घरी जाऊन आई-वडिलांची भेट घेतली. 

आई-वडिलांकडून परवानगी मिळाल्यानंतर राजेश्वरी चित्रपट करण्यास तयार झाली. 

फॅन्ड्री' चित्रपटाच्या कथेसोबतच प्रेक्षकांच्या लक्षात जब्या आणि शालू ही दोन पात्र लक्षात राहिली.