Wed, Sep 23, 2020 02:43होमपेज › Soneri › 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून 'शनया' घेणार 'एक्झिट'?

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून 'शनया' घेणार 'एक्झिट'?

Last Updated: Jul 05 2020 12:41PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही प्रेक्षकांची सर्वात पसंतीची मालिका. ही मालिका आता लॉकडाऊननंतर नव्या, फ्रेश एपिसोडसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, या मालिकेत पात्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. शनयाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर मालिकेतून एक्झिट घेणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत शनयाची भूमिका साकारायाला कमबॅक करतीय ती म्हणजे रसिका सुनील.

 शनया म्हणजेच रसिका सुनिल पुन्हा या मालिकेत एन्ट्री करणार आहे. मालिकेच्या सुरूवातीला रसिका सुनील 'शनाया'ची भूमिका साकारत होती. रसिकाने 'शनाया' अगदी घरोघरी पोहोचवली. मधल्या काही काळात रसिका आपल्या शिक्षणाकरता परदेशात गेली असता ही भूमिका अभिनेत्री ईशा केसकर साकारत होती. 

Mazhya Navryachi Bayko: Here's the first reaction of Isha Keskar ...

मात्र, नव्या शुटिंग दरम्यान ईशा केसकरची तब्येत बिघडली असून तिला आगामी शुटिंग करणे शक्य नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर सुरू होणाऱ्या या मालिकेत पुन्हा रसिका सुनिल शनयाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

सध्या या मालिकेच शुटिंग  इगतपुरी येथे करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच  फ्रेश एपिसोडसह ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 "