Sat, Nov 28, 2020 19:41होमपेज › Soneri › एव्हरग्रीन रेखा आणि अमिताभ बच्चन 

एव्हरग्रीन रेखा आणि अमिताभ बच्चन 

Last Updated: Oct 10 2019 11:31AM

रेखाची सिनेसृष्टीतील सुरूवात ते अमिताभ बच्चन यांच्याशी अफेअर १० ऑक्टोबर - वाढदिवसानिमित्त  

कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन 

सौंदर्यवती रेखाच्‍या रोमान्‍सचे अनेक किस्से चर्चिले गेले आहेत आणि आतासुद्धा चर्चिले जात आहेत. कधी जितेन्द्रसोबत तर कधी विनोद मेहरासोबत, कधी किरण कुमार तर कधी अमिताभ यांच्यासोबत. परंतु, रेखाचं सर्वांत अधिक नाव जोडलं गेलं ते बॉलिवूडचे अँग्री यंग मॅन अमिताभ बच्‍चन यांच्‍यासोबतच. खासगी आयुष्‍यात मात्र रेखाचं वैवाहिक आयुष्‍य यशस्‍वी झालं नाही.ती कायम एकटीच राहिली आहे. रेखा एकदम साधी. परंतु, तिच्‍या जीवनात अनेक चढ-उतार आले. एका ज्योतिषाने तर भविष्यवाणी केली होती की, रेखाच्‍या ग्रह स्‍थितीमुळे तिला कधी पती सुख मिळणार नाही. परंतु, तिचं ज्‍या-ज्‍या पुरूषांशी नाव जोडलं गेलं, ते साप्‍ताहिके, मासिकांमध्‍ये गॉसिप कॉलममध्‍ये येऊ लागलं. सुनील दत्त, यश कोहली आणि किशोरकुमार आणि अमिताभ बच्चन अशा अनेकांशी तिचं नाव जोडलं गेल्‍यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. रेखाला कदाचित आयुष्यभराचं खरं प्रेम मिळालं नाही. 

भानूरेखा ते रेखा 

प्रसिध्‍द तमिळ अभिनेते जेमिनी गणेशन (मूळ नाव रामस्‍वामी गणेशन) आणि जेमिनी स्‍टुडिओचीच कंत्राटदार कलाकार पुष्‍पवल्‍ली यांची रेखा ही मुलगी. रेखाचं मूळ नाव भानूरेखा. रेखाने पुढच्‍या काळात आपल्‍या वडिलांचे नाव समोर कधीचं घेतले नाही. जेमिनी यांच्‍यामुळेच तिला वयाच्‍या १३ व्‍या वर्षी तेलगूपट मिळाला. तिला कन्‍नड चित्रपटही मिळाले. रेखा दक्षिणेतून मुंबईत आली. नैराबीतील उद्‍योजक कुलजीत पालने एकदा तमिळपटात काम करणार्‍या रेखाला पाहिलं होतं. त्‍यांनी तिला 'अंजाना सफर' या चित्रपटासाठी विश्‍वजितसोबत काम करण्‍याची ऑफर दिली. 'पैसा या प्‍यार'चं शूटिंग करत असताना विश्‍वजित रेखाला बघून थबकला होता. परंतु; रेखा हिंदी बोलू शकेल का? हा प्रश्‍न होता. १९६९ रोजी 'मेहमान', 'हसीनों का देवता' (संजय खान) आणि ३० ऑगस्‍ट १९६९ रोजी 'सावन भादो' (नवीन निश्‍चल) हे चित्रपट तिला मि‍ळाले. 

Image result for rekha hd

किसींग सीन दिल्याने खळबळ

'अंजाना सफर'  या चित्रपटासाठी रेखाला किसींग सीन करायचं होतं. त्‍याकाळी किसींग सीन म्‍हणजे भलतचं काहीतरी असं वाटायचं. त्‍यामुळे चांगलीच खळबळ उडाली. तिला पत्रकार परिषदेत आचरट प्रश्‍नही विचारण्‍यात आले होते. पुढे 'अंजाना सफर' हा चित्रपट 'दो शिकारी' नावाने रिलीज झाला तो १० वर्षांनी. हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटला होता. 

नवीन निश्‍चल

त्‍यानंतर तिला प्रख्‍यात दिग्‍दर्शक मोहन सैगल यांचा चित्रपट 'सावन भादो' मिळाला. त्‍यात अभिनेता नवीन निश्‍चल होता. त्‍याचा हा पहिलाच सिनेमा होता. पण, रेखाला बघून तो अचंबित झाला. मेकअप, वेशभूषा, फिगर याबद्‍दल तिला काहीच माहिती नव्‍हतं. ती दिसायला काळी आणि जाडी होती. लोक तिच्‍यावर हसायचे. नवीन एकदा पुण्‍याला गेला असताना जयश्री टी. शी बोलला. पण, रेखाशी बोलला नाही. पुढे प्रेक्षकांनी नवीन निश्‍चलला नाकारलं. मात्र, रेखाला कधीच मागे वळून पाहावे लागलं नाही. असं म्हटलं जातं की, नवीन निश्चल तिला आवडायचा. पण, हे एकतर्फी प्रेम होतं. जसं चित्रपटाचं शूटिंग संपलं, तिचं प्रेमही संपुष्‍टात आलं. 

Related image

अमिताभ बच्‍चन

अमिताभ असो की रेखा दोघांनीही आपल्यात प्रेमसंबंध आहेत की नाही याचा आजवर कधी खुलासा केलेला नाही.  त्यांच्या प्रेमाच्या गॉसिपला सत्य असल्याचा दर्जा देणारा ' सिलसिला ' चित्रपट आला. आणि प्रेक्षकांनीही त्यांचं 'अफेअर आहेच' असं शिक्कामोर्तब केलं. रुपेरी पडद्यावरील रेखा-अमिताभ यांची केमिस्ट्री अफलातूनच होती. 'मुकंदर का सिकंदर', 'सुहाग', 'सिलसिला' असे एकापेक्षा एक चित्रपट त्‍यांनी दिले. असं म्‍हटलं जातं की, रेखाचे ४ विवाह झाले. अमिताभचा विवाह जया भादुरीसोबत झाला आणि तो आजवर कायम आहे. पण, आजही रेखाचं स्टेटस सिंगलच आहे! 

Related image

त्‍याकाळी चित्रपट सृष्टीवर अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांची जादू होती. अमिताभशी भेटल्‍यानंतर रेखाच्‍या लुकमध्‍ये बदल झाला. रेखा आणि अमिताभनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं. परंतु, त्‍यांची जुळलेली वेव्‍हलेन्‍थ आणि पडद्‍यावर झालेलं सादरीकरणं यावरून प्रेक्षकांना त्‍यांची केमिस्ट्री आवडली. पण, गॉसिपच्‍या चर्चेला उधाण आलं. असं म्‍हटलं जातं की, रेखाच्‍या मित्राच्‍या बंगल्‍यावर हे दोघे नेहमी भेटायचे. दरम्‍यान, अमिताभ यांचा 'कुली'च्‍या सेटपर अपघात झाला. जया बच्चनने रात्रंदिवस अमिताभ यांची सेवा केली. दुर्घटनेनंतर अमिताभचा पुर्नजन्मच झाला होता. त्‍यावेळी अमिताभ रेखापासून दूर झाले. 

जितेंद्र 

अल्‍प वयात पैसा, प्रसिध्‍दी, यश मिळाले की गाडी भरकटू लागते. तसचं रेखाचं झालं. लहानपणापासून जितेंद्र तिचा लाडका हिरो होता. जितेंद्रसोबत तिला हिराईन म्‍हणून एक बेचारासाठी घेण्‍यात आलं. रोमँटिक गाण्‍याचं शिमल्‍याला शूटिंग होतं. तेव्‍हा रेखा त्‍याच्‍यावर प्रेम करायची. पण, जितेंद्र शोभा कपूर (पत्‍नी) या एअर होस्‍टेसवर प्रेम करायचा. त्‍यामुळे रेखाचा हिरमोड झाला. त्‍यावेळी जितेंद्रचं नाव 'ड्रिम गर्ल' हेमामालिनी, राजश्री आणि मुमताजबरोबर जोडलं जातं होतं. रेखाने त्‍याच्‍याबरोबर अनोखी 'अदा,' 'एक ही भूल,' 'जुदाई' यांसारखे चित्रपट केले. 

Image result for rekha hd

विनोद मेहरा

'पर्दे के पिछे' या चित्रपटामुळे देखणा अभिनेता विनोद मेहरा प्रकाशात आला होता. पाली हिलला तो निभाना अपार्टमेंटमध्‍ये राहायचा. त्‍यावेळी 'रामपूर का लक्ष्‍मण'मुळे रेखा फार्मात होती. विनोदबरोबर तिला 'ऐलान' चित्रपटात काम करायची संधी मिळाली. हा चित्रपट चाललाही. विनोद मेहरा आणि रेखाच्‍या रोमान्‍सचे किस्‍से सर्वश्रृत आहेत. रेखा आणि विनोद मेहराने गुपचुप लग्‍न केलं होतं, असं म्‍हटलं जातं. परंतु, एका टीव्‍ही शोमध्‍ये रेखाने या वृत्ताला नकार देत विनोद आपला चांगला मित्र असल्‍याचे म्‍हटले होते. रेखा आणि विनोदमध्‍ये दूरी निर्माण होण्‍यामागे विनोदची आई हे एक कारण होतं. विनोदच्‍या आईला रेखा आवडायची नाही. 'प्राण जाये पर वचन न जाये' हा डाकूच्‍या जीवनावरचा चित्रपट. त्‍यात आणि धर्मेद्रसमवेतचा चित्रपट 'किमत'मध्‍ये तिने बोल्‍ड दृश्‍ये दिली होती. ही गोष्‍ट विनोदला खटकायची. विनोदचं आधी लग्‍न झालं होतं. 

किरण कुमार 

विनोद मेहराशी नातं संपल्‍यानंतर रेखा निराश होती. त्‍यावेळी तिची भेट किरण कुमारशी झाली. १९७२ ला प्रथम रेखा किरण कुमारला भेटली. किरण कुमार प्रसिध्‍द अभिनेता जीवन यांचा मुलगा. रेखाशी किरणची मैत्री जीवन यांना आवडायची नाही. परंतु, ही मैत्रीही फार काळ टिकली नाही. 

संजय खान

किरण कुमारशी मैत्री संपुष्‍टात आल्‍यानंतर रेखा पुन्‍हा एकटी पडली. निर्माते जी. एम. रोशन यांच्‍या 'दुनिया का मेला'मध्‍ये रेखा-अमिताभला घेण्‍यात आलं. तेव्‍हा अमिताभ यांचे नाव फारसे प्रसिध्दीत नसल्‍याने आयत्‍या वेळेला त्‍याच्‍याऐवजी अभिनेता संजय खानला घेण्‍यात आलं. रेखाच नाव संजय खानशी जोडलं गेलं.   

Image result for rekha hd

मुकेश अग्रवाल

रेखाने १९९० मध्‍ये नवी दिल्‍लीतील एका उद्‍योगपती मुकेश अग्रवालशी विवाह केला. लग्‍नाच्‍या काही दिवसांनंतर मुकेश अग्रवालने आत्महत्या केली. मुकेशने सुसाईड नोट लिहिली होती. त्‍यात लिहिलं होतं की, त्‍याच्‍या आत्महत्येमागे कोणालाही जबाबदार ठरवू नये. या घटनेनंतर रेखा यांचं नाव कुठल्‍याही व्‍यक्‍तीशी जोडलं गेलं नाही.

एकदा सीमी गरेवालच्या कार्यक्रमात रेखाने म्‍हटले होते, 'धीस ईज टूमारोज हेडलाईन...माझे मिस्‍टर बच्‍चन यांच्‍यासोबत कधीही, कसलेही वैयक्‍तिक संबंध नव्‍हते.' असे असले तरी रेखा आणि अमिताभ यांच्या मैत्रीचा खुलासा आजपर्यंत झालेला नाही. 

Image result for rekha hd