Sat, Jul 11, 2020 11:23होमपेज › Soneri › सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट म्हणाली... 

सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट म्हणाली... 

Last Updated: Jun 30 2020 1:48PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. यानंतर सर्व बॉलिवूड कलाकारांनी शोक व्यक्त केला होता. तर सध्या सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ति आपल्या भावाच्या अशा दुख:त निधनाने भावूक झाली आहे. याबाबत श्वेताने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

वाचा : आमीर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव, ७ जणांना लागण 

बिहारची राजधानी पाटणा येथे त्यांच्या घरी सुशांतसाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यावेळी श्वेताने ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सुशांतच्या फोटोसमोर सर्व कुंटुबीय त्याच्यासाठी प्रार्थना करत बसले असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत श्वेताने एक कॅप्शन लिहिले आहे की, 'प्रेम आणि सकारात्मकता असलेल्या माझ्या लहान भावाला शेवटचा निरोप. मी आशा करते की, आपण जिथे रहाल तिथे नेहमी आनंद रहा. आम्ही तुझ्यावर कायम प्रेम करत राहणार.' 

वाचा : अक्षयचा 'लक्ष्मी बॉम्ब' रिलीज होणार 'या' प्लॅटफॉर्मवर

श्वेताच्या या पोस्टवर सोशल मीडियावरील युजर्सनी ही आपआपल्या कॉमेन्टस् केल्या आहेत. यामध्ये एका युजर्सने लिहिले आहे की, 'तुमच्या कुटुंबाला खूपच देव शक्ती देवो.तर  दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, 'तो एक उत्तम कलाकार होता. खरंच त्याची आठवण कायम येईल.'  

(photo : shwetasinghkirti instagram वरून साभार)