Wed, Feb 26, 2020 02:09होमपेज › Soneri › देव आनंद यांच्या काळ्या कोटाने केले होते घायाळ  

देव आनंद यांच्या काळ्या कोटाने केले होते घायाळ  

Last Updated: Dec 02 2019 7:01PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

'चॉकलेट हिरो' देव आनंद अभियाबरोबरच आपल्‍या वेगळ्‍या अंदाजासाठी प्रसिध्‍द होते. २६ सप्‍टेंबर, १९२३ रोजी त्‍यांचा जन्‍म झाला. देव आनंद या जगात नसले तरी त्‍यांचा अभिनय, आठवण अजूनही जिवंत आहे. त्‍यांचे डायलॉग्ज आजदेखील लक्षात राहणारे आहेत. ३ डिसेंबर त्यांचा स्मृतीदिन. 

- १९४६ मध्‍ये 'हम एक हैं' या चित्रपटातून सिनेजगतात पाऊल ठेवणारे देवसाहब यांनी आपल्‍या ६० वर्षांच्‍या सिनेकरिअरमध्‍ये जवळपास शंभरहून अधिक चित्रपट केले. 

- त्‍याचबरोबर, देव साहब यांनी नवकेतन फिल्म्सच्‍या बॅनर खाली ३५ चित्रपटांची निर्मिती केली आणि १९ चित्रपटांचे दिग्‍दर्शन ही केले. 

- ते एक असे अभिनेते होते, ज्‍यांनी अनेक अभिनेत्रींच्‍या करिअरची नौका बॉलिवूडमध्‍ये पार केली. 

Image result for dev anand

- देव आनंद यांच्‍या सुपरहिट चित्रपटांमध्‍ये टॅक्सी ड्राईवर, मुनीम जी, फंटूश, इंसानियत, सी.आई.डी , नौ दो ग्यारह, जिद्दी, निराला, विद्या, अफसर, जाल, सोंलवा साल, काला पानी, काला बाजार, बम्बई का बाबू, माया, जब प्यार किसी से होता है, हम दोनों, बात एक रात की, असली नकली, तेरे घर के सामने, शराबी, तीन देवियां, ज्वेल थीफ, गाईड, प्रेम पुजारी, हरे राम हरे कृष्ण, जानी मेरा नाम, तेरे मेरे सपने यांसारख्‍या चित्रपटांचा समावेश आहे. 

- देव आनंद यांचं खरं नाव धर्मदेव पिरोशीमल आनंद असं होतं. त्‍यांचे वडील पिशोरीमल आनंद वकील होते. देव आनंद यांचं नाव त्‍यांच्‍या आई-वडिलांनी 'चीरू' असं ठेवलं होतं. 

- अभिनेता बनण्‍यापूर्वी देव आनंद मुंबईतील एका अकाउंटन्‍सी फर्ममध्‍ये क्लार्क म्‍हणून काम करत होते. त्‍यांना तेथे ८५ रु. पगार मिळायचा. 

- देव आनंद यांना चित्रपटात पहिली संधी १९४६ मध्‍ये मिळाली. प्रभात स्‍टुडिओचा चित्रपट 'हम एक हैं' या चित्रपटातून डेब्‍यू केला परंतु, हा चित्रपट फ्‍लॉप ठरला. या चित्रपटाच्‍या निर्मितीवेळी प्रभात स्टुडिओमध्‍ये त्‍यांची मैत्री गुरुदत्त यांच्‍याशी झाली. दोघांमध्‍ये चर्चा झाली. पहिल्‍यांदा जो यशस्‍वी होईल तो दुसरा चित्रपट होण्‍यास मदत करेल. आणि जो कुणी चित्रपट दिग्‍दर्शित करेल, तो दुसर्‍याला अभिनय करण्‍याची संधी देईल. 

Image result for dev anand

- १९४८ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'जिद्दी' हा देव आनंद यांच्‍या करिअरमधील पहिला चित्रपट जो हिट ठरला. या चित्रपटाच्‍या यशानंतर त्‍यांनी चित्रपट निर्मितीत पाऊल ठेवलं. त्‍यांनी 'नवकेतन बॅनर'ची स्‍थापना केली. 

- देव आनंद यांच्‍या लग्‍नाचा किस्सा देखील प्रसिध्‍द आहे. १९५४ मध्‍ये एका चित्रपटाच्‍या शूटिंग दरम्‍यान लंच ब्रेकमध्‍ये अभिनेत्री कल्पना कार्तिकशी विवाह केला. परंतु, त्‍यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्‍यांना दोन मुले सुनील आनंद आणि देविना आनंद. 

- देव आनंद आणि गुरुदत्त यांच्‍यामध्‍ये चांगली मैत्री होती. असं म्‍हटलं जातं की, ते एकमेकांचे शर्ट बदलून घालत असत. ज्‍या चित्रपटांची निर्मिती देवसाहब करत असत त्‍या चित्रपटांचे दिग्‍दर्शन गुरुदत्त करत असत आणि ज्‍या चित्रपटांचे दिग्‍दर्शन गुरुदत्त करत असत त्‍यात देव आनंद अभिनेते असायचे. 

- त्‍याकाळी प्रत्‍येक अभिनेत्रीला देव आनंद यांच्‍यासोबत आपण चित्रपटात काम करावं, असं वाटायचं. 

- असं म्‍हटलं जातं की, चित्रपट 'हरे रामा हरे कृष्णा'मध्‍ये देव आनंद यांच्‍या बहिणीची भूमिका करण्‍यास कुठलीही अभिनेत्री तयार नव्‍हती. कारण, देव आनंद यांच्‍या बहिणीची भूमिका साकारल्‍यानंतर आपल्‍यास प्रमुख भूमिका मिळणार नाहीत, असे अभिनेत्रींना वाटायचे. 

Image result for dev anand

- त्‍याच दरम्‍यान, एका पार्टीमध्‍ये देव यांनी जीनत अमान यांना पाहिलं आणि चित्रपटात काम करण्‍यासाठी ऑफर दिली. जीनतने देव आनंद यांच्‍या बहिणीची भूमिका केली आणि ती रातोरात स्टार बनली. 

- देव आनंद अभिनेत्री सुरैया यांच्‍याशी प्रेम करत होते. त्‍यांचे आत्‍मचरित्र 'रोमांसिंग विथ लाईफ'मध्‍ये त्‍यांनी सुरैयाशी आपण प्रेम करायचो, याबाबत सविस्‍तर लिहिलं आहे. त्‍याकाळी देव साहब यांनी सुरैया यांना तीन हजार रुपयांची हिर्‍याची अंगठी दिली होती. परंतु, दोघांचे धर्म वेगळे असल्‍यामुळे सुरैया यांची आजी देव साहब आणि सुरैय्‍या यांच्‍या लग्‍नासाठी तयार नव्‍हत्‍या. त्‍यामुळे दोघेही वेगळे झाले. त्‍यानंतर, सुरैया यांनी कधी लग्‍न केले नाही. 

- असं म्‍हटलं जातं की, देव आनंद त्‍याकाळच्‍या सर्वां हँडसम अभिनेत्‍यांपैकी एक होते. विशेष म्‍हणजे, देव साहब यांना काळा कोट घालण्‍यास बंदी होती. काळा कोट आणि पांढर्‍या रंगाच्‍या शर्टाची फॅशन देव साहब यांच्‍यामुळे आली.

Image result for dev anand

सूत्रांच्‍या माहितीनुसार, काळ्‍या रंगाच्‍या कपड्‍यांमध्‍ये देव साहब यांना पाहिल्‍यानंतर एक तरुणी त्‍यांच्‍यावर फिदा होऊन सुसाईड केलं होतं. नंतर कोर्टाने या प्रकरणाला गंभीरपणे घेत देव आनंद यांना काळा कोट घालण्‍यास मनाई केली होती. 

देव साहब यांचे ३ डिसेंबर, २०११ रोजी वयाच्‍या ८८ व्‍या वर्षी निधन झाले.