Sat, Oct 24, 2020 22:39होमपेज › Soneri › कोरोनावर मात केल्यानंतर तमन्नाची 'अशी' मेहनत (video)  

कोरोनावर मात केल्यानंतर तमन्नाची 'अशी' मेहनत (video)  

Last Updated: Oct 17 2020 5:27PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाचा काही दिवसांपुर्वी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला होता. यानंतर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सध्या तिला नुकतेच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून ती घरी परतली आहे. यांनतर तिने स्वत:च्या फिटनेसवर फोकस केले आहे. याचदरम्यान तमन्नाने वर्कआऊट एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तमन्नाने व्यायाम करतानाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टांग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात तमन्ना मेहनत घेवून वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत तमन्नाने एक कॅप्शन लिहिले आहे की, 'कोरोनाच्या काळात मी अशक्त बनले होते. माझी ताकद (शक्ती) संपली होती. ती वाढविण्यासाठी सध्या मला खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. मला लहान मुलांप्रमाणे हळू -हळू शक्ती वाढवावी लागणार आहे. कोरोना व्हायरसपासून बरे झाल्यानंतर ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. परंतु यात मेहनत जास्त आहे. परंतु शरीराला झेपेल तेवढाच व्यायाम करावा लागणार आहे.'

हा व्डिडिओ शेअर झाल्यानंतर काही तासांतच लाखो चाहत्यांनी  अनेक कॉमेंन्टस्‌ केल्या आहेत. तमन्नाचा लवकरच 'बोले चुडिया' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तमन्ना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. तमन्नाने आतापर्यंत ३ भाषेत ५० हून अधिक चित्रपटात काम केले आहेत. 'बाहुबली सीरीज' यामधील तमन्नाची भूमिका चांगलीच गाजली.  

अधिक वाचा 

'कंगना राणावत विरोधात एफआयआर दाखल करा'

आता आमिर खानच्या मुलाने घेतला 'हा' निर्णय 

(video: tamannaahspeaks instagram वरून साभार)
 

 "