...तरीही सिंदूर लावते रेखा

Last Updated: Oct 10 2019 11:52AM
Responsive image


स्‍वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन 

ज्या अभिनेत्रीनं पिढ्यानपिढ्या आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवलं. साठी उलटूनही तिच्‍या सौंदर्याची जादू आजही कमी झालेली नाही. अशी अभिनेत्री रेखाचा १० ऑक्टोवरला वाढदिवस. सिनेसृष्टीत जिच्या काळातील अभिनेते-अभिनेत्रींची मुलं अभिनय क्षेत्रात आली तरीही तिचे रसिक तसूभरही कमी झाले नाहीत. आजदेखील टॉपच्‍या सुंदर अभिनेत्रींमध्‍ये सदाबहार रेखाचं नाव घेतलच जातं. प्रत्‍येकाला भावणारी, सुंदर, प्रतिभावान आणि आपल्‍या कमलनयनांनी खूप काही सांगणारी रेखा. तिच्‍या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं थोडंच! अन्‌ ते पिढ्यान्‌पिढ्या सुरूच आहे.

ही प्रतिभावान ६५ वर्षांची अभिनेत्री अदाकारी करीत ज्‍यावेळी पडद्‍यावर येते, त्या प्रत्येक वेळी तिचं सौंदर्य खुललेलं दिसतं. तिच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍यातील चढ-उतारांप्रमाणेच तिच्‍या करिअरनेदेखील अनेक वळणे घेतली. तिच्या आयुष्यातही चढ-उतार आले. मात्र, ती डगमगली नाही, खचली नाही स्‍वाभिमानानं अन्‌ आपल्या सौंदर्यावर आणि मनमोहक अदांवर या मायावी वाटणार्‍या वास्‍तव दुनियेत निर्विवादपणे आपली हुकमत गाजवल राहिली. रेखाकडे नेमकं काय आहे, जे आजच्‍या अभिनेत्रींमध्‍ये नाही? 

Image result for rekha

तिच्या सौंदर्याची अदा भुरळ जसं बॉलिवूडला आहे तसेच हॉलिवूडलाही आहे. या अशा सौंदर्यवतीच्या सौंदर्याबद्‍दल वर्षानुवर्षे सांगितलं जातं आणि संपूर्ण जग वेडं आहे, ते तिच्या सौंदर्याच्या अदावर. अशा रेखाच्‍या सौंदर्याचं रहस्‍य काय आहे? हे सौंदर्य त्‍यांना लहानपणापासून मिळालं आहे? की काळानुरूप तिनं स्‍वत:लाच इतकं सुदंर बनवलं? तिच्या साड्या, साजशृंगार ते केसांच्या भांगेत अजुनही सिंदूर लावणं...या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्यायचीच असतील तर तिच्या चित्रपटांचा चढता आलेखच पाहणं गरजेचं आहे. आजही रेखाला पाहिल्‍यानंतर तिचे वय लक्षात येणं अशक्‍यचं! 

... तरीही सिंदूर लावते रेखा

रेखाच्या आयुष्यातील उत्‍सुकता प्रत्येकालाच आहे. ती राहते कशी ते तिचं लग्न झालं आहे का?, झालं तर नवरा कोण? आणि वैवाहिक आयुष्य नेमकं आहे तरी कसं? अशा एक ना अनेक गोष्टी रेखाच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍याबद्‍दल सांगितल्या जातात. परंतु, रेखाला त्‍याच्‍याशी काही देणंघेणं नाही. रेखाच्‍या पतीचे निधन झालं आहे, तरीही ती सिंदूर लावते. ती सिंदूर का लावते या गोष्‍टीवर अनेकदा चर्चाही झाल्‍या आहेत. कदाचित, रेखाचा हा अंदाज आहे, जो मायानगरीत केवळ टिकलाच नाही तर तिची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. आयुष्‍यातील अगणित घडामोडी तिची बायोग्राफी ‘रेखा-ॲन अनटोल्ड स्टोरी’मध्‍ये पाहायला मिळू शकतात. यामध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा झालेला आहे.  

Image result for rekha jewellery

रेखाच्‍या सौंदर्याचं रहस्‍य जाणून घेण्‍यासाठी आजचा रसिक उत्‍सुक आहे. साठी पार केल्‍यानंतरही तिने स्‍वत:ला अगदी नवतारुण्य लाभलेल्या तरुणीला लाजवेल यापेक्षा फिट ठेवलं आहे. आजदेखील रेखा एखाद्‍या पार्टीला जाते, त्‍यावेळी रसिकांच्या नजरा तिच्‍यावरून हटता हटत नाहीत. मग तो कार्यक्रम असो वा ॲवॉर्ड फंक्‍शन असो नाही तर कुणाचा विवाह समारंभ असो...त्‍याठिकाणी रेखा आपल्‍या अदाकारीने सर्वांच लक्ष वेधून घेते, आणि तितक्‍याच नम्रपणे ती सामोरी जाते.  

डार्क लिपस्‍टिक आणि साजशृंगार 

रेखाचं नाव घेताच डोळ्‍यासमोर येतो तो मोहवणारा तिचा लूक. केसात गजरा, केसातल्‍या भांगामध्ये ठसठशीत भरलेला सिंदूर आणि ओठांवर गडद रंगांचे लिपस्‍टिक. हे सगळं असलं तरी तिचे बोलके डोळे कुणाच्या नजरेतून सुटत नाहीत. त्या बोलक्या नितळ डोळ्यात काळं गडद काजळ असतं तेव्‍हा ती राजकन्येपेक्षाही अधिक सौंदर्याची खाण वाटत असते. आताचा जमाना शॉर्ट, मिनी स्‍कर्टचा असला तरी रेखाची साडी मात्र वर्षानुवर्षे मोहून टाकणारी असते. रेखाचं कौतुक करताना अनेक शब्द सापडनेसे होतात. तेव्‍हा त्यांच्या तोंडून एकच शेर येतो तो म्‍हणजे 'रेखा तो बस रेखा ही हैं'.

Image result for rekha jewellery

अजूनही फिट आहे रेखा 

या इंडस्‍ट्रीजमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्री आल्या गेल्या मात्र काळावर अधिराज्य गाजवत राहिलं ते एकच नाव ते म्‍हणजे रेखा.  रेखाचं सांगायचं झालं तर तिने आपला फिटनेस कायम ठेवला आहे. फिटनेसबद्‍दल ती नेहमीच सजग असते. तिने 'माईंड ॲण्‍ड बॉडी टेम्‍पल' नावाने एक व्‍हिडिओ शेअर केला होता. ज्‍यात ती चिरतरुण राहण्‍याचं रहस्‍य होतं. क्‍लींजर, टोनिंग, माईस्‍चॉरायझिंग आणि मेकअप रिमूव्‍ह करण्‍याबराबरच रेखा ठेवण्‍यासाठी अरोमा थेरेपी आणि स्‍पा ट्रीटमेंट देखील घेते. त्‍यामुळेच तिचा चेहरा इतका ग्‍लो करतो. 

Image result for rekha jewellery

आहाराबाबतही रेखा खूप काळजी घेते. ती साडेसात वाजताच जेवते. ज्‍यामुळे तिला हलकं वाटतं आणि त्‍यानंतर ती फ्रेश ज्‍यूस पिते. त्‍याचबरोबर खूप पाणीदेखील पिते. रेखाने एका मुलाखतीत म्‍हटले होते की, ती फक्‍त शाकाहारी जेवणच घेते. ताज्‍या भाज्‍या आणि दही, सॅलडचा नियमितपणे खाते. परंतु, रेखा भात खात नाही.  

उंची साड्‍या आणि गोल्‍डन शाईन 

रेखाच्‍या कांजीवरम साड्‍या फेव्‍हरेट आहेत. गोल्‍डन शाईन असलेल्‍या लाल, पांढर्‍या आणि इतर रंगांच्‍या साड्‍या नेसणं, तिला आवडतं. साडीसोबत ट्रॅडिशनल ज्वेलरी घालणे, बोल्ड लिप शेड्स लिपस्‍टिक लावणे हे नित्‍याचचं. 

Related image

लांबसडक काळेभोर केस 

रेखाचे काळेभोर केस तिच्‍या सौंदर्याला चारचाँद लावतात. ती केसांत दही, मध आणि अंड्‍यातील पांढरा भागाचा बनवलेला पॅक लावते. ती हेअर ड्रायरचा वापर कधीच करत नाही. किंवा केसांवर कुठलाही रासायनिक द्रव्‍यांचा वापर करीत नाही. आयुर्वेदाचा वापर ती नेहमी करते. म्‍हणून आजही तिच्या लांबसडक केसांचं रहस्‍य सर्वांना भुरळ घालणारं आहे. 

स्‍टाईल काय असते, हे रेखाकडून शिकावं. या वयातही ती आजच्‍या अभिनेत्रींना स्‍टायलिंग टिप्‍स देते. २०१७ मध्‍ये प्रसिध्‍द फोटोग्राफर डब्‍बू रतनानीच्‍या कॅलेंडर लॉन्‍चप्रसंगी रेखा पोहचली, त्‍यावेळी तिच्‍या स्‍टाईलने चाहता वर्ग घायाळ झाला होता. ब्‍लॅक ॲण्‍ड व्‍हाईट आऊटफिट, डार्क रेड लिपस्‍टिक, डोक्‍यावर बांधलेला वेगळ्‍या अंदाजातील स्‍कार्फ आणि काळा गॉगल घालून रेखा हॉट दिसत तर होतीच. पण, कार्यक्रमाचं मुख्य आकर्षणही रेखाच झाली होती. 

Image result for rekha