Thu, May 28, 2020 12:21होमपेज › Soneri › 'आईच्या पदराला कशाचीच सर नाही', बिग बींना भावना अनावर

'आईच्या पदराला कशाचीच सर नाही' : बिग बी

Last Updated: Jan 14 2020 3:18PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बिग बी अमिताभ बच्चन यांनी डोळ्याला होत असलेल्या त्रासावर डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारानंतर आईची  आठवण काढली. याप्रसंगी ते भावूक झाले. त्यांनी आपल्या आईची एक आठवण शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे - त्यांच्या डोळ्यात काळा डाग दिसतो. याविषयी डॉक्टरांना दाखवलं. तर ते म्हणाले, हे वयामुळे झालं आहे. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की, लहानपणी जसं आई पदर थोडा गुंडाळून, त्यावर फुंकर मारून गरम करून डोळ्यावर लावायची तसे करा सर्व ठीक होईल.

डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायानंतर झालेले बिग बींना आईची आठवण झाली. ते भावूक झाले. बिग बी म्हणाले, 'आता आई नाही, लाईटच्या मदतीने रुमाल गरम करून डोळ्याला लावला. पण त्याने काही वाटलं नाही. आईचा पदर तो आईचा पदर असतो त्याला दुसऱ्या कशाची सर नाही.'

अमिताभ बच्चन यांचे हे अधिकृत फेसबूक अकाउंट नाही. 

अमिताभ बच्चन यांच्या फेसबुक पोस्टवरसुद्धा अनेकांनी आईबद्दलच्या भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, खरंच आई असती तर हा काळा डाग डोळ्याऐवजी कपाळावर टिळा म्हणून दिसला असता.

वाचा -मोदी-योगींच्या फोटोंवर क्रॉस मार्क, प्रज्ञा सिंग ठाकुर यांना मिळाले पाकिट

महागाईवरून काँग्रेसचे भाजपवर टिकास्त्र