Thu, Sep 24, 2020 11:17होमपेज › Soneri › आयुष्मानचा लिप टू लिप किसींग सीन देऊन हंगामा 

आयुष्मानचा लिप टू लिप किसींग सीन देऊन हंगामा 

Last Updated: Jan 21 2020 4:52PM

शुभ मंगल ज्यादा सावधानची 'गे' लव्हस्टोरीट्रेलर लॉन्च 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आयुष्मान खुरानाने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आयुष्मान खुरानाचा सध्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जितेंद्र कुमारचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट गे कपलवर आधारीत असून आयुष्मान आणि जितेंद्रने किसदेखील दिला आहे. 

या चित्रपटात गे कपलची म्हणजेच आयुष्मान आणि जितेंद्रची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. आयुष्मानचा हा चित्रपट एक कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात नीना गुप्ता आणि गजराज राव पुन्हा एकदा एकत्र दिसणार असून त्यांच्यासोबत सुनिता राजवार, मानवी गगारू, मनु ऋषी चड्ढा, पंखुडी अवस्थी, नीरज सिंग हेदेखील दिसणार आहेत. 

वाचा - टिकटॉक व्हिडिओवरून दीपिकावर टिका (Video)

हितेश कैवल्य दिग्दर्शित 'शुभ मंगल ज्यादा सावधान’चे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

 "