Sat, Jun 06, 2020 12:37होमपेज › Soneri › अयोध्येबाबत बॉलिवूडकर काय म्हणतायेत? 

अयोध्येबाबत बॉलिवूडकर काय म्हणतायेत? 

Last Updated: Nov 09 2019 3:33PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अनेक वर्षे प्रलंबित अयोध्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिराची असल्याचा निकाल देत मुस्लिम समाजाला अयोध्येतच ५ एकर पर्यायी जागा देण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. या निर्णयाचे बॉलिवूडकरांनीही स्वागत केले. सिनेविश्वातील दिग्गज कलाकारांनी आपली मते, प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या. त्याचबरोबर सर्वांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहनही सेलिब्रेटींनी केले आहे.

अभिनेता फरहान अख्तर -

अभिनेता फरहान अख्तरने ट्विट केले. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे-"सर्वांना विनंती आहे की आज येणाऱ्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान करावा. हा निर्णय तुमच्या बाजूने असला किंवा नसला तरी त्याचा स्वीकार करा. कारण आपल्या देशाला या सर्वातून पुढे जाण्याची गरज आहे, जय हिंद."

Image may contain: text

हुमा कुरेशी 

आभिनेत्री हुमा कुरेशी म्हणते, "माझ्या प्रिय भारतीयांनो सर्वांना विनंती आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आजच्या निर्णयाचा सन्मान करावा. आपल्या सर्वांना एकत्र येऊन देशाला पुढे नेण्याची गरज आहे."

Image may contain: text

No photo description available.

Image may contain: text

Image may contain: 1 person

Image may contain: text