Fri, Oct 30, 2020 19:15होमपेज › Soneri › सर्किटची 'त्यामुळे' सटकली! म्हणाला आता माझी पेंटिंग विकत घ्या, त्यानंतर किडनीचा नंबर आहे

सर्किटची 'त्यामुळे' सटकली! म्हणाला आता माझी पेंटिंग विकत घ्या, त्यानंतर किडनीचा नंबर आहे

Last Updated: Jul 06 2020 8:54AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सध्या बॉलिवूड सेलेब्स कोरोनाने नव्हे तर एका वेगळ्याच चिंतेत आहेत. विजेचे भरमसाठ आलेले बिल पाहून सेलेब्सचा पारा वाढला आहे. तापसीने आपल्या वापरात नसलेल्या घराचे वाढीव बिल आल्यानंतर संताप व्यक्त केला. आता बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीनेही वाढीव वीज बिलावर प्रतिक्रिया दिली आहे. 

अर्शद वारसीने आपल्या ट्विटरवर सांगितले की, 'माझे विजेचे बिल वाढून आले आहे. बिल भागवण्यासाठी मी माझे पेंटिग विकण्याचा प्लॅन करत आहे आणि पुढील बिलासाठी किडनी शिल्लक ठेवली आहे. कृपया माझी पेंटिंग खरेदी करा. मला विजेचे बिल भरायचे आहे.' 

अर्शद वारसीच्या घराचे १.३ लाख रुपये वीज बिल आले आहे. 

अन्य बॉलिवूड सेलेब्सचेदेखील वाढीव विजेचे बिल

सध्या अनेक सेलेब्सची विजेची बिले वाढून आल्यानंतर त्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती सार्वजनिक केली होती. तापसी पन्नू, पुलकित सम्राट, रेणुका शहाणेसह अनेक स्टार्सनी विजेची बिले वाढून आल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. 

काय म्हणाली होती तापसी पन्नू?

तापसीच्या घराचे एका महिन्याचे बिल ३६ हजार रुपये आले होते. देशात मागील ३ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत तापसी पन्नू आपले बिल पाहून चिंतेत होती. कारण तिने आपल्या घरात कोणतेही नवे उपकरण, मशीन अथवा इलेक्ट्रिकल वस्तू खरेदी केलेली नव्हती किंवा अधिक वीज वापरलेली नव्हती.

वाचा - घराचं वीज बिल पाहून तापसी संतापली 

तापसी पन्नूने ट्विट करत म्हटले होते, 'लॉकडाऊनचे ३ महिने आणि मला आश्चर्य वाटत आहे की, मी मागील महिने माझ्या घरी कुठल्याही नव्या उपकरणांचा उपयोग केलेला नाही आणि नवी कोणतीही वस्तू खरेदी केलेली नाही. परंतु, वीजेचे वाढीव बिल मात्र आले आहे...' 

तापसी पन्नूने आणखी एक ट्विट केलं होतं. यामध्ये तिने लिहिलं होतं, "आणि हे माझ्या अपार्टमेंटचे बिल आहे, जिथे कोणीही राहत नाही आणि आठवड्यात केवळ एकदाच साफसफाई करण्यासाठी आम्ही तेथे जातो."

 "