Tue, Aug 04, 2020 14:02होमपेज › Soneri › अनुष्काची 'ती' पोझ अन् विराटचा हार्ट इमोजी!

अनुष्काची 'ती' पोझ अन् विराटचा हार्ट इमोजी!

Last Updated: Jul 16 2020 9:12PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री समजली जाते. लॉकडाऊनमुळे ती नवरा विराट कोहलीबरोबर वेळ व्यतीत करत आहे. दोघेही आपल्या रोजच्या रुटीनमधील काही बाबी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

अनुष्का शर्मा सध्या तिच्या फोटोशूटवरून चर्चेत आहे. अनुष्काने व्होग मॅगझिनसाठी काही जबरदस्त पोज दिले आहेत. त्या पोझमध्ये तिचा पूर्णतः बोल्ड लूक आहे. अनुष्काने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोजमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. 

View this post on Instagram

💛 @vogueindia @anaitashroffadajania

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

लॉकडाऊन दरम्यान अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. तिने चाहत्यांसाठी तिची सुंदर छायाचित्रे आणि व्हिडिओही पोस्ट केले आहेत.  एका फोटोशूटमध्ये अनुष्काने बिकिनीमध्येही पोज दिली आहे. तथापि, त्यामध्ये थोडेसे कव्हरअपही आहे. अनुष्काची ही छायाचित्रे तिचे इंडस्ट्री मित्र आलिया, रकुलप्रीत यांच्यासह अनेकांनी लाईक केली आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. 

View this post on Instagram

💛 @vogueindia @anaitashroffadajania

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on