Fri, Sep 18, 2020 22:12होमपेज › Soneri › 'लक्ष्मी बॉम्ब'च्या टीजरसोबत अक्षयकडून रिलीज डेटची घोषणा

'लक्ष्मी बॉम्ब'च्या टीजरसोबत अक्षयकडून रिलीज डेटची घोषणा

Last Updated: Sep 17 2020 9:12AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

स्कॉटलँडमध्ये चित्रपट 'बेल बॉटम'चे शूटिंग करता असताना सुपरस्टार अक्षय कुमारने फॅन्ससाठी एक धमाकेदार सरप्राईज दिले आहे. अक्षयने आपला बहुप्रतीक्षित चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब'च्या रिलीज डेटची घोषणा केली. राघव लॉरेंस दिग्दर्शित 'लक्ष्मी बॉम्ब' दिवाळीच्या औचित्याने ९ नोव्हेंबर, २०२० रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर उपलब्ध होणार आहे. या चित्रपटाचा टिजर रिलीज करण्यात आला आहे. अक्षय कुमार लक्ष्मण ते लक्ष्मी कसा बनतो, हे टीजरमध्ये दाखवण्यात आले आहे. 

अक्षयने ट्विटमध्ये लिहिले आहे- या दिवाळीत आपल्या घरात लक्ष्मीसोबत एक धमाकेदार बॉम्बदेखील येईल. 

तमिळ हिट 'कंचना'चा रिमेक 

'लक्ष्मी बॉम्ब' हा तमिळ हिट चित्रपट 'कंचना'चा रीमेक आहे. यामध्ये अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. सोबत कियारा आडवाणी गुड न्यूजनंतर पुन्हा अभिनय करताना दिसणार आहे. 
 

 "