Wed, Aug 12, 2020 21:04होमपेज › Soneri › तान्हाजीचा बॉक्स ऑफीसवर १०० कोटींचा गल्ला

तान्हाजीचा बॉक्स ऑफीसवर १०० कोटींचा गल्ला

Last Updated: Jan 15 2020 5:50PM
आठवड्यात १०० कोटींच्या क्लबमध्ये तान्हाजीचा समावेश 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अजय देवगन, काजोल आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर'ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाची कमाईचे आकडे ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून दिली आहे. तरणने लिहिले आहे, "तान्हाजी अजय देवगनचा १०० वा चित्रपट आहे. सहावया दिवशी या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे."

२०२० मध्ये रिलीज झालेला तान्हाजी असा पहिला चित्रपट आहे, ज्याने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. अजय देवगनने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी'ने मंगळवारपर्यंत कमाई ९० कोटी ९६ लाख रुपये केली होती. 

वाचा - पूजा सावंतचा येतोय ‘बोनस’ चित्रपट  

'शहीद भाई कोतवाल'चा प्रेरणादायी ट्रेलर (Video)