Wed, Jul 15, 2020 16:18होमपेज › Soneri › मकर संक्रांत स्पेशल सोनाली कुलकर्णीचा लूक 

मकर संक्रांत स्पेशल सोनाली कुलकर्णीचा लूक 

Last Updated: Jan 15 2020 1:07PM

'चला सकारात्मक व्हायरल पसरवूया : सोनाली कुलकर्णीची पोस्ट मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा 'धुरळा' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. सोनालीने इन्स्टाग्राम अकाउंटवर मकर संक्रांत स्पेशल लूक शेअर केला असून तिने एक पोस्टदेखील लिहिली आहे. या लूकमध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. संक्रांतीला काळी वस्त्रे का परिधान करतात, याचं महत्त्वही तिने पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

''मकरसंक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. कारण, मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे सफेद रंग जसा उष्णता परावर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही. तसा वस्त्राचा काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे, असे महत्त्व काळी वस्त्रे परिधान करण्यामागे असल्याचं सोनालीने म्हटले आहे. 

View this post on Instagram

संक्रांत स्पेशल 🪁 @snehaarjunstudio चा काळा-कम्फर्टेबल इंडो-वेस्टर्न ड्रेस... मकरसंक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. कारण, मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसरे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे सफेद रंग जसा उष्णता परावर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही. तसा वस्त्राचा काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. P.S. चोकर अर्थात @aadyaaoriginals Pictures by @thecelebstories #happybhogi #happysankranti #happylohri #happypongal ‪सुगीच्या दिवसांच्या सर्व शेतकरी बांधवांना, तसेच सर्वांना शुभेच्छा🙏🏻‬ ‪मकरसंक्रांतीला अनेक गोष्टींचे दान करतात ग्रंथदान,वस्त्रदान,रक्तदान,अर्थदान,अन्नदान,‬ ‪जलदान,ज्ञानदान,श्रमदान‬ ‪चला सकारात्मक व्हायरल पसरवूया‬ ‪नकारात्मक व्हायरल पसरविणे सोपे‬ ‪#तीळगुळ_घ्या ‬

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on