Mon, Aug 03, 2020 14:12होमपेज › Soneri › जेव्हा ड्वेन ब्रावोने श्रिया सरनला केले होते डेट 

जेव्हा ड्वेन ब्रावोने श्रिया सरनला केले होते डेट 

Published On: Sep 11 2019 9:13AM | Last Updated: Sep 11 2019 9:13AM

तामिळनाडूचे दिवंगत मुख्‍यमंत्री करुणानिधि यांच्‍यासमोर शॉर्ट ड्रेस घालून गेल्‍याने झाला होता वाद नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

दाक्षिणात्‍य स्‍टार श्रिया सरनचा आज ३७ वा वाढदिवस. ११ सप्‍टेंबर, १९८२ ला उत्तराखंडची राजधानी देहराडूनमध्‍ये श्रियाचा जन्‍म झाला. दाक्षिणात्‍य चित्रपटातील टॉपच्‍या अभिनेत्रींमध्‍ये श्रियाचा समावेश आहे.  २००१ मध्‍ये बनारसमध्‍ये एक व्‍हिडिओ शूट करून ती अभिनय क्षेत्रात आली. श्रिया  बॉलिवूड चित्रपट 'दृश्‍यम'मध्‍ये दिसली होती. त्‍यात तिने अजय देवगनच्‍या पत्नीची भूमिका केली होती. श्रियाचं वेस्टइंडीज ऑलराउंडर क्रिकेटर ड्वेन ब्रावोसोबतही नाव जोडलं गेलं आहे. श्रियाबद्‍दल जाणून घेऊयात या खास गोष्‍टी. 

श्रियाचे वडिल पुष्पेंद्र सरन भटनागर भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) मध्‍ये आणि आई नीरजा सरन दिल्ली पब्लिक स्कूलमध्‍ये शिक्षिका होती. श्रियाचं शिक्षण दिल्लीत झालं होतं. 

दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतल्‍यानंतर तिने दिल्लीच्‍या लेडी श्रीराम कॉलेजमध्‍ये आर्ट विषयात बॅचलर डिग्री घेतली. 

Image result for shriya saran

श्रियाला आपल्‍या आईकडून डान्‍स शिकता आलं. श्रियाने आईकडून कथ्‍थक आणि राजस्थानी लोक नृत्याचे प्रशिक्षण घेतलं होतं. श्रिया एक चांगली डान्‍सर आहे. 

श्रियाला एक मोठी संधी मिळाली. रेणु नाथन यांचा म्युझिक व्‍हिडिओ 'थिरकती क्यूं हवा'मध्‍ये डान्‍स करण्‍याची मोठी संधी तिला मिळाली. कॅमेर्‍याच्‍या समोर श्रियाचा हा पहिला परफॉर्म होता. तेथून श्रियाचं नशीब बदललं आणि रामोजी फिल्मने 'इष्टम' या चित्रपटाकरिता तिला साईन केले. याचदरम्‍यान, श्रियाने चार चित्रपट साईन केले होते.  श्रियाने बॉलिवूड चित्रपटही केले आहेत. २००३ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'तुझे मेरी कसम'मध्‍ये ती दिसली होती. २००४ मध्‍ये  श्रियाने 'थोडा तुम बदलो थोडा हम' हा चित्रपट केला. परंतु, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. 

Image result for shriya saran

श्रियाला 'शिवाजी द बॉस'ने नवी ओळख दिली. हा चित्रपट २००७ मध्‍ये रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर 'शिवाजी द बॉस' हिट ठरला. या चित्रपटासाठी श्रियाला सर्वोत्‍कृष्‍ट तमिळ अभिनेत्रीचा अॅवॉर्डदेखील मिळाला होता. चित्रपटात ती दाक्षिणात्‍य सुपरस्टार रजनीकांत सोबत झळकली होती. त्‍यानंतर २००८ मध्‍ये श्रिया बॉलिवूड चित्रपट 'आवारापन' दिसली. हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटला. 

Image result for shriya saran hd

शॉट ड्रेसवरून झाला होता वाद 

श्रिया दिसायला सुंदर आहे आणि ती ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. दरम्‍यान, ती 'शिवाजी द बॉस' चित्रपटाच्‍या सिल्‍व्‍हर जुबली फंक्शनमध्‍ये शॉर्ट डीप नेक असणार्‍या पांढर्‍या रंगाच्‍या ड्रेसमध्‍ये दिसली होती. या फंक्शनमध्‍ये तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्‍यमंत्री करुणानिधी प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते. श्रियाने घातलेल्‍या शॉट ड्रेसवरून काही राजकीय नेत्‍यांनी आक्षेप घेतला होता. यासाठी श्रियाला माफी देखील मागावी लागली होती. 

Image result for shriya saran hd

श्रियाचं वेस्टइंडीज ऑलराउंडर क्रिकेटर ड्वेन ब्रावोसोबतही नाव जोडलं गेलं 

सूत्रांच्या माहितीनुसार, वेस्टइंडीज ऑलराउंडर क्रिकेटर ड्वेन ब्रावोसोबत श्रिया सरनचे नाव जोडले गेले होते. २०१६ मध्ये ते एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. त्यावेळी दोघे मुंबईच्या एका रेस्टॉरेंटमधून बाहेर येताना दिसले होते. ब्रावो आणि श्रेयाने हे लन्च सीक्रेट ठेवण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु, फॅन्सच्या नजरेत ते आलेच.  

गुपचुप लग्‍न 

श्रियाने १२ मार्च २०१८ ला गुपचुप लग्‍न केलं होतं. तिचा रशियन बॉयफ्रेंड आंद्रेई कोशेचेवसोबत तिने लग्‍न केले होते. काही मोजक्‍याच मंडळींना या लग्‍नात आमंत्रित करण्‍यात आलं होतं. अभिनेता मनोज वाजपेयी आणि शबाना आजमी तिच्‍या लग्‍नात दिसले होते. 

Image result for shriya saran marriage

श्रियाने आतापर्यंत 'शिवाजी द बॉस,' 'कंदस्वामीस,' 'टॅगोर,' 'संतोषम,' 'इष्टतम' यासारख्‍या चित्रपटांशिवाय इंग्लिश चित्रपट 'कुकिंद विद स्टेला'मध्‍ये अभिनय केला आहे. 

Image result for shriya saran marriage

प्रसिध्‍द लेखक सलमान रुश्दी यांच्‍या पुस्‍तकावर आधारित चित्रपट 'मिडनाईट्स चिल्ड्रेन'मध्‍ये देखील श्रिया दिसली होती.