Sat, Nov 28, 2020 19:30होमपेज › Soneri › 'या' अभिनेत्रीने लिहिलं, 'मी डेथ बेडवर'

'या' अभिनेत्रीने लिहिलं, 'मी डेथ बेडवर'

Last Updated: Jul 13 2020 10:54AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मागील ३-४ महिन्यांत अनेक सेलेब्सचे निधन झाले आहे. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. मॉडल आणि अभिनेत्री दिव्या चौक्सेचे रविवारी कॅन्सरने निधन झाले. तिची बहिण सौम्याने आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमतून दिव्या चौक्सेच्या निधनाची पुष्टी दिली. 

सौम्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं- 'मला हे सांगताना खूप दु:ख होत आहे की, माझी चुलत बहिण दिव्या चौक्सेचे कॅन्सरने खूप छोट्या वयात आज निधन झाले. तिने लंडनमधून अभिनयाचा कोर्स केला होता आणि ती एक खूप चांगली मॉडलदेखील होती. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. गायनातही तिने आपले नाम कमावलं. आज ती आपल्याला सोडून गेली. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो. RIP.'

दिव्या चौक्सीने मृत्यूपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरीवर लिहिलं होतं- 'जे मला सांगायचे होतं, त्यासाठी शब्द पुरेस नाहीत. मी गायब होऊन ३ महिने झाले आणि संदेशांचा पाऊस आहे. ही वेळ सांगण्याची आहे - मी माझ्या डेथ बेडवर आहे. हो हे असं आहे, मी मजबूत आहे, त्या आयुष्यासाठी जेथे संघर्ष नाही. कृपया कोणतेही प्रश्न विचारू नका. केवळ परमेश्वराला माहिती आहे की, आपण माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात.'

भोपाळची दिव्या चौक्सेने लंडनमधील बेडफोर्डशायर युनिव्हर्सिटीमधून अभिनयाचा कोर्स केला होता. दिव्याने अभिनयाशिवाय डान्सचे प्रशिक्षण घेतले होते. तिने अनेक जाहिरातीत काम केले होते. दिव्याने आपल्या करिअरच्या  सुरुवातीला 'है अपना दिल तो अवारा' चित्रपट केला होता.