Tue, Aug 04, 2020 22:45होमपेज › Soneri › नताशाने शेअर केला हार्दिकसोबतचा सर्वात बोल्ड फोटो!

नताशाने शेअर केला हार्दिकसोबतचा सर्वात बोल्ड फोटो!

Last Updated: Jan 15 2020 6:29PM

हार्दिक पांड्या आणि नताशा स्‍टेनकोविकनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

हार्दिक पांड्याने नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्‍टेनकोविकसोबत साखरपुडा करून चाहत्‍यांना सुखद धक्‍का दिला. साखरपुड्यानंतर या लव्हबर्डने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. 

नताशाने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरून दोघांचा एक फोटो शेअर केला. या फोटोत हार्दिक आणि नताशा दोघेही एका बीच साइडवर उभे असल्याचे दिसत आहे. यावेळी नताशाने मोनोकिनी तर हार्दिकने शॉर्ट्स परिधान केले आहे. याशिवाय दोघांनी आपापल्या डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. नताशाने फोटो शेअर केल्यानंतर हार्दिकनेही कमेंटमध्ये हार्टची इमोजी टाकून दाद दिली. याशिवाय या फोटोवर युजर्स ही काही कॉमेंन्टस करत आहेत. 

वाचा : आलिया बनली 'माफिया क्वीन'

नताशा काही दिवसांपुर्वी बिग बॉसमध्ये झळकली होती. हार्दिकने दुंबईमध्ये एका स्पीडबोटवर नताशाला प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर हार्दिकने १ जानेवारी रोजी दुंबईतील समुद्राच्या मध्यभागी छोट्या बोटीत नताशासोबत साखरपुडा केला. 

View this post on Instagram

🔥❤️ #throwback😍 @hardikpandya93

A post shared by 🎀Nataša Stanković🎀 (@natasastankovic__) on