Sat, Dec 05, 2020 23:32होमपेज › Soneri › रितेश देशमुखने मानले अजित पवारांचे आभार; पण कशासाठी?

रितेश देशमुखने मानले अजित पवारांचे आभार; पण कशासाठी?

Last Updated: Jan 15 2020 5:48PM

रितेश देशमुख आणि अजित दादामुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील घोषणा केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. याबद्दल कार्यवाही करावी, अशी सूचना नगरविकास विभागाला दिली आहे. तशी पोस्ट अजित पवार यांनी ट्विटरवरून दिली. आता या ट्विटवर अभिनेता रितेश देशमुखने आपल्या प्रतिक्रिया मांडल्या असून त्याने अजित पवार यांचे ट्विट रिट्विट केले आहे. 

वाचा -पूजा सावंतचा येतोय ‘बोनस’ चित्रपट  
'शहीद भाई कोतवाल'चा प्रेरणादायी ट्रेलर (Video)

अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या आहेत, असं ट्विट केलं आहे.’

यानंतर विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि अभिनेता रितेश देशमुखने अजित पवारांचे ट्विटरवरून आभार मानले. रितेश देशमुखने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे- 'श्री विलासराव देशमुखजी यांनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्याबद्दल मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन, अजित दादा.'