Tue, Aug 04, 2020 13:44होमपेज › Soneri › 'मीटू'नंतर नाना पाटेकरांचे वेबसीरीजमधून पुनरागमन 

'मीटू'नंतर नाना पाटेकरांचे वेबसीरीजमधून पुनरागमन 

Last Updated: Jul 11 2020 3:25PM
RAW चे फाऊंडर आरएन काव यांच्यावर आधारित वेब सीरीज

मुंबई : पुढारी ऑनलाईन

चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला 'रॉ'चे फाउंडर रामेश्वर नाथ काव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आणि वेब सीरीज आणत आहेत. नाना पाटेकर यामध्ये मुख्य भूमिकेत असून काव यांची व्यक्तीरेखा ते साकारतील. मीटूच्या आरोपांनंतर नाना पाटेकर या सीरीजमधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने आरोप केल्यानंतर नाना 'हाऊसफुल- ४ट या चित्रपटातून बाहेर करण्यात आले होते. 

वेबसीरीजमध्ये २० एपिसोड असणार 

फिरोज यांनी सांगितले की, या प्रोजेक्टवर आम्ही ५ वर्षांपासून काम करत आहोत. आधी आम्ही काव यांच्या आयुष्यावर २० एपिसोडची एक वेब सीरीज आणणार आहोत. नंतर चित्रपट केला जाईल. यातील कलाकार फायनल झाले आहेत. चित्रपट आणि वेब सीरीज दोन्हींचे कास्ट एकच असतील. चित्रपटाचे शूटिंग या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. पडद्यावर काव यांच्या आयुष्यावरील भाग, रॉची स्थापना आणि काही स्पेशल ऑपरेशन्स दाखवले जातील.