Wed, Feb 19, 2020 13:31होमपेज › Soneri › स्टॉक मार्केटचा सर्वात मोठा स्कॅम, येतोय 'द बिग बुल' 

स्टॉक मार्केटचा सर्वात मोठा स्कॅम, येतोय 'द बिग बुल' 

Last Updated: Feb 13 2020 5:30PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

अभिषेक बच्चन स्टारर आगामी चित्रपट द बिग बुलची रिलीज डेट जाहिर झाली आहे. अभिषेकने सोशल मीडियावर चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करत सांगितले आहे की, बिग बुल २३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. पोस्टरमध्ये अभिषेकचा लुक कुठे न कुठे तरी तुम्हाला मणिरत्नम यांच्या गुरु चित्रपटांची आठवण करून देईल. 

कुकी गुलाटी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट बिग बुल १९९२ मध्ये झालेल्या भारतीय स्टॉक मार्केटच्या आतापर्यंत सर्वात मोठ्या स्कॅमवर आधारित आहे. द बिग बुल टायटल हर्षद मेहता यांच्यासाठी वापरण्यात आला होता. या घोटाळ्याचा तो मुख्य आरोपी होता. हर्षदने अनेक आर्थिक गुन्हे केले आहेत. बिग बुलमध्ये अभिषेक बच्चन हर्षद मेहताची भूमिका करत आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रूजची मुख्य भूमिका असून या चित्रपटाचे प्रोडक्शन अजय देवगन आणि आनंद पंडित करत आहेत. 

फॅन्सनादेखील अभिषेकचा हा लूक आवडला आहे. काही फॅन्सनी अभिषेकच्या या लूकची तुलना गुरू चित्रपटातील त्याच्या लूकशी केली आहे. गुरूमध्येदेखील अभिषेक बच्चन एका बिझनेसमॅनच्या भूमिकेत होता. 

वाचा - खास व्हॅलेंटाईन डे स्पेशल सॉन्ग ऐकलं का?

बिग बुलचे पहिले पोस्टर मागील महिन्यात २ जानेवारीला रिलीज झाले होत. काळा गॉगल आणि हातात सोन्याची अंगठी असलेला अभिषेकचा लूक खूपच इम्प्रेसिव्ह दिसलं होता. पोस्टरच्या बॅकग्राउंडमध्ये फेडेड फॉन्टमध्ये लिहिलं होतं, '२०२० चं वर्ष आहे...द बिग बुलचं.' 

चित्रपटाची पंचलाईन आहे-'वो इंसान जिसने भारत को सपने बेचे'.तर अभिषेक बच्चनच्या दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये बिग बुलशिवाय बॉब बिस्वास या चित्रपटाचा समावेशही आहे. हा चित्रपट दीया अन्नापूर्ण घोष दिग्दर्शित करत आहेत. याशिवाय, अभिषेक डिजीटल सीरीज ब्रीद-२ मध्येही दिसणार आहेत.