नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावर आधारित ‘मुंबई डायरीज २६/११' ही वेब सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या वेबसीरिजचा सध्या फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. ही वेबसीरिज पुढील वर्षी मार्च २०२१ मध्ये रिलीज होणार आहे.
अधिक वाचा : आई होण्यामागे फराह खानचा धक्कादायक खुलासा
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना या वेबसीरिजच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. या वेबसीरिजमधून एक वेगळी कहाणी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये पोलिस आणि डॉक्टर रूग्णांना वाचविण्यासाठी करत असलेले अथक प्रयत्नही दाखविले आहेत.
अधिक वाचा : नोरो फतेहीने डान्ससोबत गायले ‘दिलबर’ गाण्याचे अरेबिक व्हर्जन
या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई आणि श्रेया धनवंतरी यांनी डॉक्टर, परिचारिका, पॅरा वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचारी यांच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. ‘मुंबई डायरीज २६/११' ही वेबसीरिज मार्च २०२१ मध्ये ॲमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. निखिल अडवाणी आणि निखिल गोंजालविस यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.
(video : Amazon Prime Video India youtube वरून साभार)