तान्हाजी चित्रपटाचा नवा टीझर रिलीज (Video)

Last Updated: Dec 09 2019 6:23PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अजय देवगनचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’चा टीझर रिलीज झाला आहे. अजय, मराठा योद्धा, तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 
टीझरमध्ये अजय आपल्या सैनिकांना शत्रुंच्या विरोधात सिंहगड किल्ल्यासाठी लढण्यास प्रोत्साहित करताना दिसतो आहे. हा टीजर रिलीज करताना त्याने लिहिले आहे की - गड आला पण सिंह गेला. 

तान्हाजी या चित्रपटाचा मराठी ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे.  

अजयशिवाय, या चित्रपटात सैफ अली खान, काजोल यांच्याही भूमिका आहेत. काजोलने तान्हाजी यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर, लोकप्रिय मराठी अभिनेते शरद केळकर, देवदत्त नाग आणि शशांक शेंडे यांच्याही भूमिका चित्रपटात आहेत. 

अजय २००८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'यू मी और हम'नंतर पहिल्यांदा पत्नी काजोलसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दुसरीकडे अजय आणि सैफ अली खान २००६ मध्ये आलेला चित्रपट ‘ओमकारा’मध्ये एकत्र दिसले होते.  तान्हाजी चित्रपट १० जानेवारी, २०२० रोजी रिलीज होणार आहे.