Tue, Jun 15, 2021 11:33होमपेज › Soneri › तापसी पन्नूचा येतोय 'शाबाश मिथू' 

तापसी पन्नूचा येतोय 'शाबाश मिथू' 

Last Updated: Dec 03 2019 5:49PM

तापसी पन्नूमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी 'शाबाश मिथू' हा चित्रपट लवकरच घेवून येत आहे. तापसी भारतीय महिला क्रिकेटची कर्णधार मिताली राजच्या बायोपिकमध्ये दिसणार असल्याचे काही दिवसांपासून वृत्त होते. परंतु, आतापर्यंत तापसीने याचा खुलासा कधीही केला नव्हता. आज मात्र मिताली राजच्या वाढदिवसानिमित्त तापसीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून यांची माहिती दिली आहे. 

या फोटोत तापसीसोबत मिताली राज असून मिताली केक कापताना दिसत आहे. या फोटोसोबत तापशीने एक कॅप्शन ही लिहिली आहे की, 'हॅपी हॅपी बर्थडे कॅप्टन मिताली राज. तुम्ही आम्हाला खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत, आणि तुम्हचा प्रवास पडद्यावर दाखवण्यासाठी माझी निवड होणे हे खरोखरच भाग्याचे आहे. या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला कोणती भेट देऊ शकतो हे मला माहित नाही, परंतु मी वचन देते की, मला पडद्यावर पाहून तुम्हाला अभिमान वाटेल असा अभिनय करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आता मी यासाठी पूर्णपणे तयार आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा कर्णधार.'

गेल्या वर्षी या बायोपिकसाठी तापसी पन्नूला साईन केल्याचे वृत्त होते. परंतु चित्रपटाविषयी विचारणा केल्यावर स्क्रिप्ट अद्याप तयार नाही असे निर्मात्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर आता तापसीने सांगितले आहे की, 'स्क्रिप्ट आत्ता तयार करण्यात आली आहे. जर मला ऑफर मिळाली तर मी खूप मेहनत करेन. मला आनंद आहे आणि मला खरोखर स्पोर्ट्स बायोपिक करायची आहे.'

या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया यांनी केलं आहे. आता तापसी मितालीची भूमिका रुपेरी पडद्यावर कशी साकारते याची उत्सुकता फॅन्सना लागली आहे. याशिवाय तापसी 'थापड' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

(photo : taapsee instagram वरून साभार)