Fri, May 29, 2020 19:01होमपेज › Soneri › ब्रेकअप होताच 'या' अभिनेत्रीकडून बॉयफ्रेंडची तुलना थेट वेटरशी!

ब्रेकअप होताच 'या' अभिनेत्रीकडून बॉयफ्रेंडची तुलना थेट वेटरशी!

Last Updated: Feb 14 2020 3:23PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडमध्ये अफेअर्स कधी सुरु होतील आणि कधी संपतील याचा नेम नसतो. अभिनेत्री सना खान आजकाल मेलव्हन लुईसबरोबर झालेल्या ब्रेकअपनंतर चर्चेत आहे. मेलव्हन लुईसने तिच्याशी विश्वासघात केल्याचा सना खानने मुलाखती दरम्यान सांगितले होते. 

बॉयफ्रेंडच्या ब्रेकअपनंतर सना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या फोटोमध्ये सना खान हातात बर्गर घेऊन दिसत आहे. फोटोमध्ये असे लिहिलेले आहे की जेव्हा वेटर आपल्या बॉयफ्रेंडपेक्षा अधिक देखणा असतो. हा फोटो शेअर करत सना खानने तिचे अभिव्यक्ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो पोस्ट करत लिहिले की, "जेव्हा जग ठीक होते, तेव्हा मी या मुद्द्याकडे कसे दुर्लक्ष केले." सना खानच्या या फोटोला चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या. सना खानच्या फोटोवर भाष्य करताना अभिनेत्री पायल राजपूतने लिहिले की, "पुढे जा. तू एका चांगल्या व्यक्तीसाठी पात्र आहेस." पायल राजपूतशिवाय माही विजने सुद्धा सना खानच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली. सना खान तिच्या प्रियकरापासून ब्रेकअप झाल्यानंतर नैराश्यात गेली होती. अभिनेत्रीने स्वत: मुलाखतीत ही माहिती दिली आणि सांगितले की देवाने मला वाचवले.

प्रसिद्ध नर्तक, मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या सना खानने तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 'ये है हाय सोसायटी' या चित्रपटाद्वारे केली होती, ज्यात तिने 'सोनिया' ची भूमिका साकारली होती. यानंतर सना खानने 'गोल, बॉम्बे टू गोवा, जय हो, वजह तुम हो, टॉयलेट एक प्रेम कथा, अयोग्य' आणि बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आपल्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त सना खान अनेक तेलुगु चित्रपटांमध्येही दिसली आहे.