रणबीर, रणवीर आणि दीपिका

Last Updated: Nov 07 2019 9:09PM
Responsive image


बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण रणवीर सिंहशी झालेल्या विवाहानंतरही सिनेसृष्टीत कार्यरत आहे. अलीकडेच तिने इतक्यात आई होण्याचा कसलाही विचार नसल्याचे स्पष्ट करत आपल्याविषयी सुरू असलेल्या अफवात्मक चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रणवीरशी विवाहापूर्वी दीपिकाची रणबीर कपूरशी असलेल्या रिलेशनशिपविषयी बरीच चर्चा होती. या दोघांनी काही चित्रपटांतून एकत्र कामही केले आहे. इतकेच नव्हे तर प्रेक्षकांनीही त्यांना हिट जोडी म्हणून डोक्यावर घेतले होते. ‘ये जवानी है दिवानी’, ‘तमाशा’, ‘बचना ऐ हसीनो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दीपिका-रणबीरची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती.

दुसरीकडे, रणवीर आणि दीपिकाच्या ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांंनी चांगली पसंती दिली होती. अलीकडेच दीपिकाने रणवीर आणि रणबीर यांच्यामध्ये तुलना करत दोघांच्या अभिनयातील फरक सांगितला आहे. दीपिका म्हणते, रणवीरचा अभिनय हा स्वयंस्फूर्त किंवा स्पाँटेनियस असतो. त्याला खूप तयारी करावी लागत नाही. त्याच्या परफॉर्मन्समध्ये 50 टक्के रिहर्सल असते आणि 50 टक्के तो स्वतः तयार होत असतो. दुसरीकडे, रणबीरकबाबत बोलायचे तर तो कॅरेक्टरमध्ये चटकन शिरतो. तसेच भूमिकेनुसार तो स्वतःमध्ये बरेच बदलही करतो. त्याचे कपडे, चप्पल, परफ्युम सर्व काही बदलून जाते.