Mon, Aug 10, 2020 04:42होमपेज › Soneri › कपूर घराण्याची पाकिस्तानातील प्रसिद्ध हवेली होणार जमीनदोस्त

कपूर घराण्याची पाकिस्तानातील प्रसिद्ध हवेली होणार जमीनदोस्त

Last Updated: Jul 13 2020 6:01PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलीवू़डच्या प्रसिध्द कपूर घराण्याची पाकिस्तानातली वडिलोपार्जीत कपूर हवेली जमीनदोस्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे. ही हवेली ल्या पेशावर येथे आहे. हवेली पाडून त्या ठिकाणी व्यापारी संकूल उभारण्यासाठी या हवेलीचा सध्याचा मालक अडून बसला आहे. जवाहिऱ्या हाजी मोहम्मद इसरार असे या मालकाचे नाव आहे.

आणखी वाचा : 'या' अभिनेत्रीने लिहिलं, 'मी डेथ बेडवर'

राज कपूर यांची वडिलोपार्जित हवेली पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजार या परिसरात आहे. या हवेलीला 'कपूर हवेली' या नावाने ओळखले जाते. राज कपूर यांचे आजोबा देवान बशेश्वरनाथ कपूर यांनी भारत-पाकिस्तान फाळणी होण्याआधी १९१८ ते १९२२ या काळात ही हवेली उभारली होती. पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांचा जन्म याच हवेलीत झाला होता. फाळणी नंतर हे कुटुंब भारतात आले. १९९९० मध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर ही हवेली पाहण्यासाठी पेशावरमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी तिथून याची माती आपल्यासोबत आणली होती. 

आणखी वाचा : बॉलिवुडमध्ये कोरोना उद्रेक सुरुच! आता..

पाकिस्तान सरकार या हवेलीला संग्रहालयात परिवर्तीत करायचं आहे. २०१८ साली पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मकसूद कुरेशी यांनी ऋषी कपूर यांना तसे आश्वासन दिले होते. मात्र सध्याचा मालक य़ा गोष्टीसाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. 

पाकिस्तान सरकारने तसे प्रयत्न देखील केले होते. पण हा मालक तयार होत नाही, त्यामुळे या हवेलीचे जमीनदोस्त होणे निश्चीत मानले जात आहे. 

आणखी वाचा : 'सौरभ गांगुलीने धोनीला 'ताट सजवून दिले'

जवळपास ४० ते ५० खोल्या असलेली ही हवेली एकेकाळी खूप आलिशान होती. सुरुवातीला ही हवेली ५ मजल्यांची होती. मात्र भूकंपामुळे निर्माण झालेल्या चिरांमुळे त्याचे वरिल ३ मजले उध्वस्त झाले. 

अभिनेते दिलीप कुमार यांचं वंशपरंपरागत घर देखील ख्वानी बाजारच्या जवळंच आहे.

आणखी वाचा : पायलटांचे विमान उड्डाण करण्यापूर्वीच 'या' पंचकामुळे जमिनीवर!