Sat, Oct 24, 2020 09:25होमपेज › Soneri › अनुराग-पायल वाद : ‘हा’ क्रिकेटर अडकणार?

अनुराग-पायल वादाच्या भोवऱ्यात अडकणार ‘हा’ क्रिकेटर

Last Updated: Oct 18 2020 2:14PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री पायल घोष चांगलीच चर्चेत आली आहे. पायल घोषने अनुराग कश्यप विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. आता या प्रकरणात पायलने एका क्रिकेटपटूला ओढले आहे.  पायलने ट्वीट करत अनुराग कश्यापले लैंगिक अत्याचार केल्यावे या क्रिकेटपटूला माहित होते, मात्र तो या गोष्टीवर मौन धरत असल्याचे पायलने म्हटले आहे.

भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणचे नाव घेत पायलने अनुराग कश्यपनं माझ्यावर जबरदस्ती केल्याचे मी कधी बोलले नाही. मात्र इरफान पठाणला सर्व माहिती होते. माझा चांगला मित्र समजून मी त्याला सर्व सांगितले होते, मात्र आता त्यानं या प्रकरणी मौन धरले आहे असे ट्विट करत इरफानला टॅग केले आहे. त्यामुळे बी टाऊनसह क्रिकेट जगतातदेखील खळबळ माजली आहे. 

तसेच, इरफान पठाणसोबत फोटो शेअर करत मी इरफानला टॅग केले याचा अर्थ मला तो आवडतो असे नाही. मी त्याला अनुराग कश्यपनं जबरदस्ती केल्याचे सांगितले होते. मी अपेक्षा करते की, मी इरफानला जे सांगितले आहे, त्याबद्दल त्याने बोलावे अशी भावना व्यक्त केली आहे. 

अनुरागने २०१४ मध्ये मला घरी बोलवून माझा विनयभंग केला आणि अश्लील वर्तन केले, असे पायलने आपल्या आरोपामध्ये म्हटले होते. 

 "