Tue, Jun 15, 2021 13:25
लग्नच वैध नाही, मग घटस्फोट कसला? नुसरत जहाँने लग्नाचे फोटो टोटल डिलीट मारले!

Last Updated: Jun 10 2021 1:59PM

पुढारी ऑनलाईन डेस्क; पश्चिम बंगालच्या खासदार नुसरत जहा यांनी आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवरून हटवले आहेत. सध्या नुसरत आणि निखिल जैन यांच्यात वाद सुरू आहे. ती सहा महिन्यांची प्रेग्नेंट आहे. पण, ही गोष्ट तिचा पती निखिलला अमान्य आहे. 

West Bengal: TMC MP Nusrat Jahan calls her marriage with Nikhil Jain  'invalid'

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहा सध्या तिच्या लग्नावरून आणि प्रेग्नेंसीवरून चर्चेत आहे. मागील वर्षापासून नुसरत-निखिल जैन यांच्यामध्ये वाद सुरू होता. पण, यावेळी त्यांनी मौन सोडले आहे. हे भांडण सार्वजनिक झालं आणि तिने स्पष्ट केलं की, त्यांचं लग्न वैध नाही, मग घटस्फोट कसला? 

Trinamool MP Nusrat Jahan says marriage with Nikhil Jain not legal,  separation happened long back | India News,The Indian Express

लग्न झाल्यानंतर नुसरत यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. निखिलसोबत ती वधुच्या वेषात दिसत होती. आता तिने आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. 

Nusrat Jahan, Nikhil Jain, Nusrat Jahan Wedding, Nusrat Jahan Wedding  Pictures नुसरत जहां शादी फोटो - News Nation

नुसरत यांच्या लग्नाची चर्चा झाली होती. २०१९ मध्ये दोघांनी तुर्कीमध्ये लग्न केले होते. नुसरतच्या प्रेग्नेंसीच्या वृत्तावर निखिल जैनचे म्हणणे आहे की-त्याला नुसरतच्या प्रेग्नेंसीविषयी माहिती नाही.

Nusrat jahan wedding receptions food menu include famous bengali dessert |  नुसरत जहां के रिसेप्शन में ऐसा है फूड मेन्यू, बंगाल की फेमस मिठाई का स्वाद  चखेंगे मेहमान | Hindi News, फूड

मीडिया रिपोर्टनुसार, नुसरत अभिनता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे नुसरत आणि निखिल यांच्या नात्यात दुरावा आला. 

May be an image of 1 person, standing and jewellery

नुसरत म्हणाल्या, म्हणूनचं लग्नाला भारतात वैधानिक मान्यता देण्याची गरज होती. परंतु, असं झालं नाही. त्यामुळे घटस्फोटाचा प्रश्नचं उरत नाही. कायद्याप्रमाणे हे लग्न व्हॅलिड नाही तर एक लिव्ह-इन रिलेशनशिप आहे.

May be an image of 1 person

नुसरत यांनी निखिल यांच्यावर पैशांची हेराफेरीही केल्याचा आरोप केला आहे. नुसरत म्हणाल्या, निखिलने तिला न सांगता तिच्या अकाउंटमधून पैसे काढले आहेत. स्वत:ला श्रीमंत सांगून रात्री कोणत्याही वेळेला बेकायदेशीर पध्दतीने तिच्या बँक अकाउंट्समधून पैसे घेतले. आम्ही दोघे वेगळे झाल्यानंतरही हा प्रकार तसाच सुरू आहे.  

May be an image of 1 person

नुसरतने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले आहे, 'मी त्या महिलेला आठवू इच्छित नाही, जी आपले तोंड नेहमी बंद ठेवायची. मी अशीचं खुश आहे.'