Thu, Sep 24, 2020 10:35होमपेज › Soneri › ३० वर्षांपूर्वी करत होती 'त्याला' डेटिंग; ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न!

३० वर्षांपूर्वी करत होती 'त्याला' डेटिंग; ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न!

Last Updated: Jan 22 2020 6:34PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन पाचव्यांदा बोहल्यावर चढणार आहे. बेवॉच फेम पामेला अँडरसनने यावेळी हॉलिवूड प्रोड्यूसर जॉन पीटर्सशी लग्न केले. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर पामेलाने बॅटमॅन चित्रपटाचे निर्माते जॉमसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पामेला अँडरसन आणि जॉन पीटर्स यांचे एका खासगी सेरेमनीमध्ये एका बीचवर लग्न पार पडले. 

dinsta

पामेला अँडरसनने जॉन पीटर्ससाठी एक सुंदर कवितादेखील लिहिली. त्याचा हॉलिवूडचा 'ओरिजनल बॅड बॉय' असा उल्लेख केला.  पामेलाच्या या कवितेचे नाव होतं-'द ओरिजिनल 'बॅड बॉय ऑफ हॉलिवूड.  अँडरसनने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, "कोणीही तुलना करू शकत नाही, मी त्यांच्यावर खूप प्रेम करते."

dinsta

पामेला अँडरसन ५२ वर्षांची तर जॉन ७२ वर्षीय आहेत. याआधी तिने रॉकर्स टॉमी ली आणि किड रॉकसोबत विवाह केला होता. त्यानंतर तिने दोन वेळा प्रोफेशनल पोकर रिक सॉलोमॉनसोबत लग्न केले होते. 

 "