Mon, Sep 21, 2020 19:13होमपेज › Soneri › Love Aaj Kal वर 'जबरा' मीम्स!

Love Aaj Kal वर 'जबरा' मीम्स!

Last Updated: Feb 14 2020 4:24PM
कोणत्या बोल्ड सीन्सवर लागली कात्री? 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन आपल्या लव्ह आज कल या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आज  हा चित्रपट रिलीज झाला आहे. इम्तियाज अलीने 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. 

चित्रपटाच्या नावावरून समजते की, लव्ह आज कल एक रोमँटिक चित्रपट आहे. नुकताच, या चित्रपटाला नुकताच सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट मिळाले आहे. सेन्सॉरने या चित्रपटातील काही सीन्सला कात्री लावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लव्ह आज कलच्या चित्रपटाच्या सुरूवातीला एक किसिंग सीन होता, तो सीन हटवण्यात आला आहे. त्याशिवाय, सारा आणि कार्तिकच्या काही इंटिमेट सीन्स, आणखी एक लव्हमेकिंग सीनवरदेखील सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे.

या चित्रपटामध्ये सारा-कार्तिक शिवाय रणदीप हुड्डा आणि आरुषी शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये दोन वेगवेगळ्या लव्ह स्टोरीज दाखवण्यात आल्या आहेत. एक स्टोरीमध्ये कार्तिक आणि साराचा रोमान्स तर दुसऱ्या स्टोरीमध्ये आरुषी शर्मा आहेत. एकीकडे रोमँटिक चित्रपट आणि दुसरीकडे कार्तिक आणि सारा अली खान ही फ्रेश जोडी असूनही प्रेक्षकांच्या पसंतीस मात्र हा चित्रपट उतरलेला नाही. 

वाचा -  #Valentinesday 'या' जोड्यांनी केलं व्हॅलेंटाईन डेला लग्न!

या चित्रपटाबद्दल सोशल रिॲक्शन्स नेगेटिव्ह येत आहेत. प्रेक्षक लव्ह आज कलला डिजास्टर म्हणत आहेत. 

प्रेक्षकांनी शेअर केले फनी मीम्स 

प्रेक्षकांनी सारा अली खान-कार्तिक आर्यन यांच्या लव्ह आज कल चित्रपटाबद्दल फनी मीम्स शेअर केले आहेत. एका प्रेक्षकाने आलियचा रडतानाचा फनी मीम शेअर केला आहे. दुसऱ्या प्रेक्षकाने चित्रपटाची कहानी, प्लॉट, एंटरटेनमेंटवर एक मीम शेअर केला आहे. याशिवाय, कॉमेंट्स करत हे फनी मीम्स व्हायरल होत आहेत. 

वाचा - सुष्मिताचे रोहमनसोबत रोमॅंटिक डेटिंग

 "