Sat, Jan 25, 2020 23:41
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › कैफी आझमी यांना आदरांजली, गुगलचे खास डुडल 

कैफी आझमी यांना आदरांजली, गुगलचे खास डुडल 

Last Updated: Jan 14 2020 1:02PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

उर्दू साहित्यिक, कवी, गायक, गीतकार कैफी आझमी यांची १४ जानेवारीला १०१ वी जयंती. यानिमित्ताने गुगलने खास डूडल साकारून त्यांना आदरांजली वाहिली आहे. कैफी आझमी यांनी विसाव्या शतकात प्रेमावर आधारित कविता लिहिल्या होत्या. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथे झाला. 

त्यांनी वयाच्या ११व्या वर्षापासून कविता लिहायला सुरूवात केली होती.  'शोर युँही ना परिंदो ने मचाया होगा…कोई जंगल की तरफ 'शहर' से आया होगा! ' हा त्यांचा शेर प्रसिध्द आहे. कैफी आझमी मुंबईमध्ये एका उर्दू वर्तमान पत्रासाठी लिहित होते. त्यांचा 'झंकार' कविता संग्रह १९४३ मध्ये प्रकाशित झाला होता. 

आझमी यांना तीन फिल्मफेयर ॲवार्ड, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

अभिनेत्री शबाना आझमी या कैफी आझमी यांच्या कन्या होत. 

वाचा - मोदी-योगींच्या फोटोंवर क्रॉस मार्क, प्रज्ञा सिंग ठाकुर यांना मिळाले पाकिट

महागाईवरून काँग्रेसचे भाजपवर टिकास्त्र