न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन
हॉलिवूड अभिनेता निकोलस केजने पाचव्यांदा लग्न केल्यामुळे चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे वयाच्या ५७ व्या वर्षी त्याने लग्न केले असून आपल्यापेक्षा जवळपास ३१ वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीसोबत तो विवाहबद्द झाला. आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्याच्या आधीच्या चारीही पत्नी त्याच्या या लग्नात हजर होत्या. रिको शिबाटा असे त्याच्या प्रेयसीचे नाव होते.
निकोलस केजने घोस्ट रायडर चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
निकोलस केज आणि रिको शिबाटा यांचं लग्न लास व्हेगासमधील एका हॉटेलमध्ये पार पडलं. लग्नात निकोलसच्या चार पत्नीही उपस्थित असल्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागून राहिल्या. १६ फेब्रुवारीला त्याने हे लग्न केले. इतक्या दिवसानंतर निकोलसने रिकोसोबतचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
रिको शिबाटा जपानी आहे. त्यामुळे तिने पारंपरिक जपानी ड्रेस किमोनो लग्नात घातला होता. तर निकोलसने काळ्या रंगाच्या टक्सिडो परिधान केला होता.
[PICS] Nicolas Cage and Riko Shibata Wedding Photos at the Wynn Hotel in Las Vegas on February 16th 2021 pic.twitter.com/xRK2ZjbztX
— NicolasCageOnFire (@CageOnFire) March 6, 2021