Sat, Sep 26, 2020 22:37होमपेज › Soneri › प्रसिद्ध लोककलावंत 'नवरी नटली फेम' छगन चौगुले कालावश

प्रसिद्ध लोककलावंत 'नवरी नटली फेम' छगन चौगुले कालावश

Last Updated: May 21 2020 8:46AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले काळाच्या पडद्याआड गेले आहेत. चौगुले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबई येथे सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू होते. रूग्णालयातच त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नवरी नटली हे गीत अतिशय लोकप्रिय ठरले आहे. या गाण्यामुळे त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. दिग्गज लेखक रत्नाकर मिटकरी यांच्यानंतर आणखी एका दिग्गजाचा कोरोनाने बळी गेला आहे.  

 "