दिशा सालियानच्या शेवटच्या कॉलचा खुलासा!

Last Updated: Sep 18 2020 4:39PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुशांत सिंह राजपूतची तथाकथित मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस करत आहेत. दिशाने शेवटचा काॅल कुणाला केला होता, याविषयीचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले की, दिशाने तिच्या मृत्यूपूवीर् तिची मैत्रीण अंकिताला फोन केला होता. दिशाने आपला शेवटचा कॉल मुंबई पोलिस हेल्पलाईन नंबर-100 वर केला होता, ही माहिती खोटी आहे. अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दिशा 8 जूनला मुंबईतील मलाड येथे तिच्या इमारतीच्या कंपाउंड खाली मृतावस्थेत आढऴली होती. दिशाचा मृत्यूचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला जात होता. मुंबई पोलिसांनी या दोन्ही केसचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. 

वाचा - ‘दिशा सालियनची बलात्कारानंतर हत्या, सुशांतचाही मर्डर’ 

काही दिवसांपूवीर् भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. सुशांतचा खून झाला असून त्याची मॅनेजर दिशा सालियन हिची बलात्कारानंतर हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता.