Thu, May 28, 2020 13:40होमपेज › Soneri › चर्चा गौहरच्या नृत्याची...

चर्चा गौहरच्या नृत्याची...

Last Updated: Nov 07 2019 9:13PM
छोट्या पडद्यावर आणि हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली गौहर खान ही अभिनेत्री सध्या वेबसिरीजमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच ती विमानतळावर विमान येण्याची प्रतीक्षा करत होती. बराच काळ फ्लाईट न आल्याने चौकशी केली असता विमान येण्यास आणखी 3 तास लागणार असल्याचे समजले. मग या तीन तासांचा ‘सदुपयोग’ करण्याचे तिने ठरवले आणि चक्‍क विमानतळावर गौहरबाईंनी सेनोरिटा या गाण्यावर नृत्यसराव सुरू केला. या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही तासांतच तो व्हायरल झाला. गौहरच्या सहकलाकारांनी याबाबत तिला शुभेच्छा दिल्या; पण चित्रपटातील चमूने मात्र याची दखलही घेतली नाही.

सतत चर्चेत राहण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारी अभिनेत्री म्हणून गौहर खानची ओळख आहे; पण असे म्हटलेले तिला आवडत नाही. ती म्हणते, एखाद्या घटनेचा दाखला देत तुम्ही माझ्याबाबत असे म्हणत असाल तो माझ्यावर अन्याय ठरेल.’ गौहर काहीही म्हणत असली तरी सत्य लपून राहिलेले नाही. बहुतांश नायिकांना हल्ली सोशल मीडियावरील प्रसिद्धीचे व्यसन जडले आहे. त्यामुळेच दैनंदिन आयुष्यातील अगदी छोट्या-छोट्या गोष्टीही ‘कॅश’ करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळेच त्यांचे सोशल मीडिया अकौंट नेहमी ‘भरलेले’ असतात.