Mon, Jan 20, 2020 18:55होमपेज › Soneri › रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’  

रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’  

Last Updated: Jan 14 2020 5:59PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा आज करण्यात आली आहे. सध्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.  

प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती चंद्रमुखी दिसत आहे. या फोटोसोबत प्रसाद ओक यांनी कॅप्शन लिहिली आहे की, 'तो ध्येय धुरंधर राजकारणी, ती तमाशातली शुक्राची चांदणी, लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली कहाणी!, विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित, संगीतकार अजय-अतुल या जोडीसोबत प्रथमच, माझं नवं दिग्दर्शकीय पाऊल!, लवकरच!.'

वाचा : 'आईच्या पदराला कशाचीच सर नाही' : बिग बी

'चंद्रमुखी’ हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्रं आहे. या चित्रपटात राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घालणारी कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात ‘चंद्रमुखी’ची भूमिका कोण साकारणार आहे यांची अधिकृत माहित मिळालेली नाही. परंतु 'लागिरं झालं जी' फेम शिवानी बावकर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

वाचा : कैफी आझमी यांना आदरांजली, गुगलचे खास डुडल

'चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले. तर   चित्रपटाची पटकथा- संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिले आहेत. याशिवाय अक्षय विलास बर्दापूरकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

(photo : oakprasad instagram वरून साभार)
 

View this post on Instagram

तो ध्येयधुरंधर राजकारणी ती तमाशातली शुक्राची चांदणी लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली कहाणी...!!! विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित संगीतकार अजय-अतुल या जोडीसोबत प्रथमच माझं नवं दिग्दर्शकीय पाऊल...!!! लवकरच...!!! @akshaybardapurkar @chinmay_d_mandlekar @planet.marathi @goldenratiofilmsg @ajayatulofficial @sanjaymemane @manjiri_oak #vishwaspatil #chandramukhi #planetmarathi #prasadoak #akshaybardapurkar #चंद्रमुखी

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on